गडकरी यांचा विश्वास : व्यास यांच्या निवडीनिमित्त जल्लोषनागपूर : केंद्र व राज्यातील भाजप सरकारने विकास कामांना गती दिली आहे. नागपुरातील मेट्रो रेल्वे २०१८ पर्यंत धावू लागेल. रस्त्यांची कामेही लवकरच होतील. या विकास कामांच्या बळावरच भाजप आगामी महापालिकेच्या निवडणुकीत जिंकून इतिहास रचेल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीत भाजपचे गिरीश व्यास यांची अविरोध निवड झाली. त्यानिमित्त महाल येथील टिळक पुतळा कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे जल्लोष करण्यात आला. या वेळी गिरीश व्यास यांचा गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी गडकरी म्हणाले, गिरीश व्यास यांनी भाजपला मजबूत बनविण्याचे काम केले. बऱ्याचदा आमदारकीचे ते प्रबळ दावेदार असतानाही राजकीय अडचणींमुळे त्यांच्यासोबत अन्याय झाला. मात्र, त्यांनी कधीही याबाबत नाराजी व्यक्त केली नाही. पक्षसंघटनेच्या कामावर लक्ष केंद्रित केले. आज बऱ्याच तपश्चर्येनंतर त्यांना आमदार बनण्याची संधी मिळाली, याचे समाधान वाटते, असेही ते म्हणाले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यास यांचे अभिनंदन करीत केंद्र व राज्य सरकार करीत असलेली कामे घराघरापर्यंत पोहचविण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी माजी खा. बनवारीलाल पुरोहित, दत्ता मेघे, भाजपचे शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे, महापौर प्रवीण दटके, जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, आ. सुधाकर देशमुख, आ. अनिल सोले, जि.प. अध्यक्षा निशा सावरकर यांनीही पक्ष बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. मंचावर विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेन्द्र कोठेकर, आ. सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे, आ. समीर मेघे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, संघटन मंत्री राजेश बागडी, श्रीकांत देशपांडे, दयाशंकर तिवारी, चेतना टांक, डॉ. कीर्तिदा अजमेरा, सुभाष पारधी, माया इवनाते, अर्चना डेहनकर उपस्थित होत्या. सत्काराला उत्तर देताना व्यास यांनी सर्व नेते व कार्यकर्त्यांचे आभार मानले. संचालन जिल्हा ग्रामीणचे महामंत्री अरविंद गजभिये यांनी केले. या वेळी संजय भेंडे, प्रभाकर येवले, प्रमोद पेंडके, विक्की कुकरेजा, गुड्डू त्रिवेदी, बाल्या बोरकर, कल्पना पांडे, श्रीपाद रिसालदार, अमोल ठाकरे, किशोर पलांदुरकर, श्याम चांदेकर, आशीष पारधी, बंडू सिरसाट, रामभाऊ अंबुलकर, बबली मेश्राम, महेंद्र राऊत, अशफाक पटेल, चंदन गोस्वामी यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. (प्रतिनिधी)
विकासाच्या बळावर भाजप जिंकणार
By admin | Updated: December 14, 2015 03:26 IST