शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या दौऱ्यानिमित्त ४७ चौकांमध्ये भाजप करणार शक्तीप्रदर्शन स्वागत नियोजनाची बैठक

By योगेश पांडे | Updated: March 27, 2025 21:53 IST

गुढीपाडव्याला शहराचे चौक सजविणार

योगेश पांडे - नागपूरनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुढीपाडव्याच्या दिवशी नागपूर दौरा असल्याने भारतीय जनता पक्षाकडून त्याची जोरदार तयारी सुरू आहे. या दौऱ्यानिमित्त भाजपकडून शहरातील विविध चौक सजविण्यात येणार आहेत. तसेच ४७ चौकांमध्ये भाजप कार्यकर्ते शक्तीप्रदर्शन दाखविणार आहेत. कडेकोट सुरक्षाव्यवस्था असल्याने पंतप्रधान नेमके किती शहर पदाधिकाऱ्यांना भेटणार हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही.पंतप्रधान ३० मार्च रोजी माधव नेत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त नागपूरला येणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ते थेट रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसराकडे रवाना होतील. तेथून ते दीक्षाभूमीला जातील व त्यानंतर माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमात पोहोचतील. तेथून ते सोलार एक्सप्लोजिव्हला भेट देणार आहेत.

सुमारे चार तास पंतप्रधान नागपुरात राहणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने स्वागत तयारीबाबत भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महाल येथील शिक्षक सहकारी बॅंकेच्या सभागृहात बैठक झाली. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, विदर्भ संघटक डॉ. उपेंद्र कोठेकर, भाजपा नागपूर शहर अध्यक्ष बंटी कुकडे, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, आ. प्रवीण दटके, आ. संदीप जोशी, आ. चरणसिंग ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते. मोदी ज्या मार्गावरून जातील तेथे तसेच शहरातील ४७ चौकांमध्ये कार्यकर्त्यांना एकत्रित आणून त्यांचे स्वागत करण्याची सूचना देण्यात आली.

गुढीपाडव्याचा दिवस असल्याने वेगवेगळ्या आकर्षक वेशभूषा, चौकात सजावट, स्वागताचे फलक तसेच गुढी उभारून पंतप्रधानांचे स्वागत करा, अशी सूचना बावनकुळे यांनी केली. या बैठकीला माजी आमदार अनिल सोले, माजी आमदार विकास कुंभारे, माजी आमदार राजू पारवे, माजी आमदार सुधीर पारवे, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, विष्णू चांगदे, माजी महापौर अर्चना डेहनकर, डॉ. राजीव पोतदार, जयप्रकाश गुप्ता हेदेखील उपस्थित होते.