शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्रच लढणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 20:06 IST

२०१९ च्या निवडणुकांमध्ये भाजपा-शिवसेना युती दिसणार नाही, असे बोलले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसे अनेकदा जाहीरसुद्धा केले आहे. असे असले तरी येत्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येतील, असा विश्वास राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक कार्यकर्ता या नात्याने व्यक्त केला.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांचा विश्वास : काँग्रेसचे सरकार असताना दादाजींना मदत का केली नाही?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१९ च्या निवडणुकांमध्ये भाजपा-शिवसेना युती दिसणार नाही, असे बोलले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसे अनेकदा जाहीरसुद्धा केले आहे. असे असले तरी येत्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येतील, असा विश्वास राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक कार्यकर्ता या नात्याने व्यक्त केला.वनभवन सभागृहात आयोजित बैठकीसाठी ते आले असता पत्रकारांशी बोलत होते. पत्रकारांनी त्यांना शिवसेना व भाजपातील भांडणाबाबत विचारणा केली असता मुनगंटीवार म्हणाले, सरकार म्हणून शिवसेना- भाजपासोबतच आहे. त्यांचा कुठलाही त्रास नाही. येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर त्याला अजून खूप वेळ आहे. राजकारणात तासात परिस्थिती बदलत असते. केवळ सत्ता आणि घराणेशाही टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येऊ शकते तर मग एकाच विचारांनी प्रेरित पक्ष का एकत्र येऊ शकत नाही. भाजपा-शिवसेना हे एकाच विचारांचे आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र येतील, असा मला भाजपाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून विश्वास असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.एचएमटी तांदळाचे जनक दिवंगत दादाजी खोब्रागडे यांना पाच कोटीची मदत भाजपा सरकार करू शकली नसल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतीच केली. यासंदर्भात मुनगंटीवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले, हे वक्तव्य म्हणजे या शतकातील सर्वात मोठा जोक आहे. दादाजींचे संशोधन हे काही आजकालचे नाही. अनेक वर्षांपासूनच आहेत. तेव्हा राज्यात काँग्रेसचेच सरकार होते, त्यांनी तेव्हा दादाजींना मदत का केली नाही? असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला.पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तारयेत्या ४ जुलैपासून नागपुरात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपा