शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

भाजप-सेनेत राडा

By admin | Updated: June 6, 2017 01:39 IST

संपूर्ण कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नागपुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्र बंदला रामटेकमध्ये हिंसक वळणकार्यकर्ते आमने-सामने पोलिसांचा लाठीमारनागपुरात शेतकरी संघटना आक्रमक राष्ट्रवादीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : संपूर्ण कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नागपुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध राजकीय पक्षांसह विविध संघटनांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन केले. रामटेकमध्ये मात्र बंदला हिंसक वळण मिळाले. येथे भाजपा व शिवसेना कार्यकर्ते आमने सामने आले. वाद विकोपास गेल्याने त्यांच्यात हाणामारी झाली. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. यामुळे तणावाचे वातावरणही निर्माण झाले होते. रामटेक शहरात भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हॉटेल बंद करण्यावरून सकाळी ११ वाजताच्या सुमारास वाद निर्माण झाल्याने तसेच भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक बिकेंद्र महाजन यांना जबर मारहाण केल्याने पोलिसांना नाईलाजास्तव लाठीमार करावा लागला. शिवसेनेने शेतकरी आंदोलन आणि बंदला आधीच समर्थन जाहीर केले होते. रामटेक शहरात सकाळीपासून संपूर्ण बाजारपेठ बंदच होती. मात्र भाजपचे नगरसेवक आलोक मानकर यांनी त्यांचे हॉटेल सुरूच ठेवल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना हॉटेल बंद करण्याची वारंवार विनंती केली. मानकर हॉटेल बंद करीत नसल्याचे लक्षात येताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आत शिरून हॉटेलमधील साहित्य फेकायला सुरुवात केली. आलोक मानकर यांच्या सूचनेवरून भाजपचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करीत शिवसेनेचे माजी नगरसेवक बिकेंद्र महाजन यांना जबर मारहाण केली. त्यातच भाजपच्या नगसेविका वनमाला चौरागडे यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. त्यात त्या खाली कोसळल्याने चेंगराचेगरीत जखमी झाल्या. कार्यकर्ते महात्मा गांधी चौकात पोहोचताच उपविभागीय पोलीस अधिकारी लोहित मतानी यांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांत करीत बिकेंद्र महाजन यांना ताब्यात घेतले. परंतु, कुणीही ऐकायला तयार नसल्याने शेवटी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या प्रकरणात भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात पोलिसांत तक्रारी नोंदविल्या. यासोबतच शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, जय जवान जय किसान, विदर्भ राज्य आंदोलन समिती, शिवसेना आदींसह विविध संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको व धरणे देत आंदोलन करण्यात आले. शेतकरी संघटना व विदर्भ राज्य आंदोलन समितीने तुकडोजी पुतळा परिसरात आंदोलन केले. यावेळी रस्त्यावर भाजीपाला फेकून शासनाचा निषेध नोंदवण्यात आला. जय जवान जय किसान संघटनेतर्फे दिघोरी चौक व कळमना मार्केटसमोर आंदोलन करण्यात आले.कुठे काय झाले कचारीसावंगा येथे ‘रास्ता रोको’काटोलमध्ये कडकडीत बंदसावनेरात शेतकरी संघटनेचे आंदोलनबाजार समितीतील व्यवहार ठप्पजिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रेही ओस