शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलि अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून भाजप आमदाराच्या भाच्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:08 IST

वेकोलितील अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून एका तरुण मूकबधिर कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अक्षय राजेश्वर देशमुख (२३) रा. लक्ष्मी नारायण अपार्टमेंट वैष्णोदेवी चौक असे मृताचे नाव आहे. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांचा तो भाचा होता.

ठळक मुद्देमूकबधिर कर्मचाऱ्याला दिला जात होता त्रास : सुसाईड नोटही सापडले

 लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : वेकोलितील अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून एका तरुण मूकबधिर कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अक्षय राजेश्वर देशमुख (२३) रा. लक्ष्मी नारायण अपार्टमेंट वैष्णोदेवी चौक असे मृताचे नाव आहे. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांचा तो भाचा होता.अक्षय वेकोलित कार्यरत होता. दोन महिन्यापूर्वीच तो कामाला लागला होता. अक्षय लहानपणापासूनच मूकबधिर होता. तो मंगळवारी सायंकाळी घरी आला. यानंतर अपार्टमेंटच्या छतावर निघून गेला. तिथे लिफ्टच्या स्टोअर रुममध्ये केबलच्या मदतीने गळफास घेतला. रात्री अक्षय घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. रात्री ११.४५ वाजता त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. कुटुंबीयांनी नंदनवन पोलिसांना माहिती दिली. यासंदर्भात आ. खोपडे यांनी सांगितले की, अक्षय अतिशय हुशार मुलगा होता. त्याचे इंग्रजी अतिशय उत्तम होते. इंग्रजीतच तो ड्राफ्टींग करायचा. दोन महिन्यापूर्वीच तो वेकोलित कामाला लागला. त्याचा मोठा भाऊसुद्धा तिथेच कामाला आहे. दोघेही सोबतच ये-जा करायचे. अक्षयचा वरिष्ठ अधिकारी त्याला खूप त्रास द्यायचा. कुठलेही काम सांगायचा. एकप्र्रकारे त्याचा छळ सुरू होता. याबाबत त्याने भावाला सांगितले. त्याच्या भावाने काल मला याची कल्पनाही दिली होती. मी मुंबईत असल्याने नागपुरात आल्यावर बघतो असेही सांगितले होते. अक्षयने मृत्यूपूर्वी एक पत्रही लिहून ठेवले आहे. नंदनवन पोलिसांकडे ते सोपवण्यात आले असून त्यात त्याने कसा त्रास होता याचा उल्लेख केला असल्याचे आ. खोपडे यांनी सांगितले.

टॅग्स :Suicideआत्महत्याWestern Coal Fields Limited Nagpurवेस्टन कोल फिल्डस् लिमिटेड नागपूर