शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

भाजपचे माजी आमदार रामदास आंबटकर यांचे निधन

By योगेश पांडे | Updated: April 30, 2025 16:10 IST

भाजप-अभाविप वर्तुळात शोककळा : विदर्भात संघटन वाढविण्यात मौलिक योगदान

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानपरिषदेचे भाजपचे माजी आमदार डॉ.रामदास आंबटकर (६४) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. चेन्नई येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी अनेक वर्ष जुळले होते. ते विधान परिषदेचे सदस्य म्हणून वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या निधनामुळे भाजप व अभाविप वर्तुळात शोककळा पसरली आहे.

मागील काही दिवसांपासून ते किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. त्यातच त्यांना न्युमोनियाचे निदान झाले. त्यांच्यावर अगोदर नागपुरातील एका खाजगी इस्पितळात उपचार सुरू होते व त्यानंतर त्यांना चेन्नई येथील महात्मा गांधी मेडिकल मिशन हेल्थकेअर सेंटर येथे त्यांना हलविण्यात आले होते. बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. रामदास आंबटकर यांचा जन्म १ जुलै १९६० रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील वडनेर या छोट्याशा गावात झाला. लहानपणापासूनच ते संघाचे स्वयंसेवक होते. १९७९ मध्ये यवतमाळमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ता झाले. त्यानंतर अभाविप यवतमाळ शहर सरचिटणीस, विस्तारक आणि अभाविपचे पूर्णवेळ कार्यकर्ते बनले. त्यानंतर अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, विदर्भ प्रदेश संघटन सचिव म्हणूनदेखील त्यांनी जबाबदारी सांभाळली. ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट तसेच व्यवस्थापन परिषद सदस्यदेखील होते. २००४ मध्ये त्यांनी राजकीय क्षेत्रात काम सुरू केले. २०१५ मध्ये त्यांना भाजप महाराष्ट्राचे सरचिटणीस बनवण्यात आले.

गडकरींनी व्यक्त केला शोक"डॉ.आंबटकर यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. विदर्भात भाजप आणि अभाविपचे संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी मौलिक परिश्रम केले होते. विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांनी नेहमी आवाज उचलला होता. कुशल संघटक आणि विचारधारेप्रति समर्पित असलेल्या डॉ.आंबटकर यांच्या निधनामुळे विदर्भातील सामाजिक-राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे."

- नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री

टॅग्स :nagpurनागपूरBJPभाजपा