शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

भाजप पत्ते उघडेना!

By admin | Updated: November 22, 2015 02:59 IST

विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक तोंडावर आहे. काँग्रेसने बऱ्यापैकी तयारी सुरू केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ ची भूमिकानागपूर : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक तोंडावर आहे. काँग्रेसने बऱ्यापैकी तयारी सुरू केली आहे. मात्र, दुसरीकडे भाजपने अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत. पक्षात इच्छुक उमेदवारांची मोठी रांग आहे. उमेदवार निश्चित करताना अनेकांच्या राजकीय पुनर्वसनाचा प्रश्न विचारात घ्यावा लागणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गृहजिल्ह्यातील ही निवडणूक आहे. त्यामुळे भाजपकडून प्रत्येक पाऊल सावधपणे टाकले जात आहे.नागपूरची ही जागा सध्या काँग्रेसचे आमदार राजेंद्र मुळक यांच्या ताब्यात आहे. ही जागा जिंकून भाजपला आपला दबदबा सिद्ध करायचा आहे. ही जागा भाजपच्या हातून गेली तर त्याची राज्यात चर्चा होईल व विरोधकांना अधिकच बळ मिळेल, याची जाणीव भाजप नेत्यांना आहे. त्यामुळे जवळचा, दूरचा असे सर्व भेदाभेद बाजूला सारून निवडून येण्याची शक्यता असलेल्या व पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या उमेदवारालाच संधी द्यायची, असा विचार भाजपमध्ये सुरू आहे. गेल्या निवडणुकीत चार मतांनी पराभव पत्करावा लागलेले माजी आ. अशोक मानकर, महापौर प्रवीण दटके, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जोशी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश मानकर, भाजपचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास आदींची नावे चर्चेत आहे. प्रत्येकाचा दावा एकमेकांपेक्षा तगडा आहे. कुणी पक्ष अडचणीत असताना भार उचलला, तर कुणी पक्षाने विधानसभेची उमेदवारी नाकारल्यानंतरही पक्षाचा झेंडा सोडला नाही. त्यामुळे कुणाची पक्षनिष्ठा अधिक हे ठरविणे नेत्यांसाठी देखील कठीण झाले आहे. कोणतीही निवडणूक म्हटली की भाजपची धामधूम वेळेआधीच सुरू होते. या निवडणुकीत मात्र सारेच कमालीचे शांत आहेत. इच्छुक उमेदवार उघडपणे दावेदारी करण्यास मागेपुढे पाहत आहेत तर स्थानिक नेतेही सध्या काहीच ठरले नाही, असे सांगून ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ ची भूमिका घेत आहेत.विशेष म्हणजे विधान परिषदेच्या या निवडणुकीसाठी भाजपतर्फे अद्याप एकही अधिकृत बैठक घेण्यात आलेली नाही. निरीक्षक नेमण्यात आलेले नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतरच अशी बैठक होईल. वरून सर्व शांत दिसत असले तरी पडद्यामागून मात्र नियोजन सुरू आहे, इच्छुक उमेदवारांच्या नावांची मतदारांमध्ये चाचपणीही केली जात आहे, असे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)