शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-काँग्रेस सारखेच : श्रीहरी अणे यांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 20:56 IST

काँग्रेस कमकुवत असल्याचे भाजप सांगत आहे. कॉंग्रेसही भाजपला प्रत्युत्तर देत नाही. दोन्ही पक्ष परस्पर विरोधी भूमिका घेण्यास टाळत आहेत. भाजप-कॉंग्रेसकडे कोणताच मुद्दा निवडणूक लढविण्यासाठी नसल्यामुळे ही पहिलीच बिनमुद्याची निवडणूक आहे. हे दोन्ही पक्ष साररखेच असल्यामुळे अ‍ॅड. सुरेश माने यांना विदर्भाच्या मुद्यावर रिंगणात उतरवावे लागले, असा हल्लाबोल विदर्भ निर्माण महामंचचे नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी केला.

ठळक मुद्देपुलवामा हल्ल्याचे राजकारण होतेय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेस कमकुवत असल्याचे भाजप सांगत आहे. कॉंग्रेसही भाजपला प्रत्युत्तर देत नाही. दोन्ही पक्ष परस्पर विरोधी भूमिका घेण्यास टाळत आहेत. भाजप-कॉंग्रेसकडे कोणताच मुद्दा निवडणूक लढविण्यासाठी नसल्यामुळे ही पहिलीच बिनमुद्याची निवडणूक आहे. हे दोन्ही पक्ष साररखेच असल्यामुळे अ‍ॅड. सुरेश माने यांना विदर्भाच्या मुद्यावर रिंगणात उतरवावे लागले, असा हल्लाबोल विदर्भ निर्माण महामंचचे नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी केला.अ‍ॅड. अणे म्हणाले, विदर्भाच्या मुद्यावर फसविल्यामुळे मतदारांनी कॉंग्रेसला सत्तेतून बाहेर काढले. भाजपने विदर्भाच्या मुद्याचे भांडवल करून विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढविली. मात्र, सत्ता मिळताच त्याच मुद्याला भाजप विसरला. विदर्भ निर्माण महामंच विधानसभेत २० ते ३० वयोगटातील उमेदवारांना, महिलांना प्राधान्य देणार आहोत. तेलंगणासारखे आंदोलन करा आम्ही दखल घेऊ असे गडकरींनी सांगितले होते. परंतु आम्हाला जाळपोळ, रक्तपात नको आहे. पुलवामा हल्ल्याचे राजकारण करून भाजप मते मागत आहे. कॉंग्रेसही नागपुरात बाहेरचा उमेदवार आणून लाजेखातर निवडणूक लढवित आहे. परंतु विदर्भ निर्माण महामंचाचे अ‍ॅड. सुरेश माने हे विदर्भाच्या मुद्यावर निवडणुकीत उभे आहेत. केवळ नागपूर-मुंबई महामार्ग, मेट्रो म्हणजे विकास नाही. विदर्भातील शेतकरी, त्यांचे प्रश्न, बेरोजगारी, आदिवासीवरील अत्याचार, विदर्भातील सरकारची असफल ठरलेली क्षमता यावर महामंच निवडणूक लढवित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अ‍ॅड. वामनराव चटप यांनी आम्ही निवडणुकीकडे आंदोलन म्हणून पाहत असल्याचे सांगितले. तर अ‍ॅड. माने यांनी विदर्भ वेगळा झाल्यास विकासाचा प्रश्न मार्गी लागेल, असा दावा केला. या वेळी सुनील चोखारे उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShrihri Anneश्रीहरी अणेMediaमाध्यमे