शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंध ठेवणाऱ्या पतीला दणका

By admin | Updated: June 26, 2017 02:02 IST

परस्त्रीसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या पतीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला.

हायकोर्ट : घटस्फोटासाठी दाखल अपील फेटाळले लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : परस्त्रीसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या पतीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला. पतीने घटस्फोट मिळण्यासाठी दाखल केलेले अपील फेटाळण्यात आले. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व अरुण उपाध्ये यांनी हा निर्णय दिला. प्रकरणातील पती-पत्नी राकेश व किरण यांनी ९ एप्रिल २००१ रोजी प्रेमविवाह केला होता. लग्नाला दोघांच्याही पालकांची संमती होती. दरम्यान, राकेशने किरणच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. ३० नोव्हेंबर २००५ रोजी कुटुंब न्यायालयाने याचिका खारीज केली. त्या निर्णयाविरुद्ध राकेशने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. लग्नानंतर दोन वर्षापर्यंत किरण चांगली वागली. त्यानंतर तिने शारीरिक व मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. किरण चारित्र्यावर संशय घेते. मोठ्या आवाजात भांडते. मित्रांना व कार्यालयातील सहकर्मचाऱ्यांना फोन करून अनैतिक संबंधाबाबत विचारपूस करते. शरीरसंबंध ठेवण्यास नकार देते. ती घरगुती कामे करीत नाही. सकाळी उशिरा उठते. ती जुलै-२०११ मध्ये घर सोडून निघून गेली. तेव्हापासून ती वेगळी राहात आहे असे राकेशचे म्हणणे होते. न्यायालयात सादर माहितीनुसार, मुंबईतून नागपुरात बदली झाल्यानंतर राकेश सुमारे १८ महिने विधवा बाल मैत्रिणीच्या घरात राहिला. त्याचे स्वत:चे घरही नागपुरात असून त्या घरात त्याचे आई-वडील राहतात. परंतु, आई-वडील त्याला सोबत ठेवत नव्हते. राकेशला परस्त्रियांसोबत अनैतिक संबंध ठेवण्याची सवय असल्याचा आरोप किरणने केला होता. त्यावरून राकेशच्या चारित्र्यावर संशय निर्माण झाला.