शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

नागपुरात ‘हरक्विलीन’ बाळाचा जन्म

By admin | Updated: June 12, 2016 02:27 IST

फोटो बघून दचकलात का?, विश्वास बसत नाही? पण ही सत्य घटना आहे. लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये शनिवारी पहाटे या विचित्र मुलीचा जन्म झाला आहे.

दुर्मीळ आजार : तीन लाख बालकांमधून एकाला होतो हा आजारनागपूर : फोटो बघून दचकलात का?, विश्वास बसत नाही? पण ही सत्य घटना आहे. लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये शनिवारी पहाटे या विचित्र मुलीचा जन्म झाला आहे. साधारण तीन लाख बालकांमध्ये असे बालक जन्माला येत असल्याचे म्हटले जाते. वैद्यकीय भाषेत या आजाराला ‘हरक्विलीन’ म्हणतात. या आजाराचे बाळ जास्त दिवस जिवंत राहत नाही. मध्यभारतातील ही पहिलीच घटना असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.अमरावती येथील रहिवासी असलेली रेवती कृष्णा राठोड (२२) असे त्या बाळंतिणीचे नाव. डिगडोह येथील लता मंगेशकर हॉस्पिटलच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात या विचित्र मुलीचा जन्म शनिवारी पहाटे १२.४५ मिनिटांनी झाला. या संदर्भात अधिक माहिती देताना लता मंगेशकर हॉस्पिटलच्या बालरोग विभागातील तज्ज्ञ डॉ. यश बानाईत यांनी ‘लोकमत’ला सांगितले, या महिलेची सिझर करून प्रसूती करण्यात आली. जन्मलेले बाळ पाहताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या बाळाला ‘हरक्विलीन’ हा जन्मजात दुर्मिळ आजार आहे. अनेकदा अशा अर्भकाचा गर्भातच मृत्यू होतो किंवा जन्मल्यानंतर असे बाळ जास्त दिवस जगत नाही. हा आनुवंशिक आजार आहे. ‘एबीसीए १२’ नावाच्या जीनमध्ये गडबड झाल्याने हा आजार होतो. यात त्वचा प्रभावित होते. जन्मलेल्या या मुलीची त्वचा फार जाड आणि त्यात भेगा गेल्या आहेत. यामुळे ती दिसायला विचित्र दिसते. नाकाचा आणि डोळ्यांचा पूर्ण विकास झालेला नसल्याने ते पूर्णपणे लाल रंगाचे आहेत. काही ठिकाणी त्वचा इतकी ताणलेली आहे की अवयवांचा विकास झालेला नाही. विशेषत: बोटं गळून पडलेली आहेत. याला ‘अ‍ॅटोअ‍ॅम्पूटेशन’ म्हणतात. त्वचेच्या ताणामुळे बाळाला श्वास घेण्यास अडचण जाते आणि बाळ दगावण्याचे हेच मुख्य कारण ठरते. या शिवाय त्वचेला भेगा पडल्याने ससंर्गाचा धोका निर्माण होऊन मृत्यूचे कारण ठरू शकते. साधारण तीन लाख बालकांमध्ये एखादेच या आजाराचे बाळ जन्माला येते. मध्यभारतातील ही पहिली घटना असावी, कारण या संदर्भात सध्यातरी कुठे नोंद नाही. या महिलेचे हे पहिलेच बाळंतपण होते. प्रसूतीपूर्वी तिने कुठेच सोनोग्राफी केले नसल्याचे तिचे नातेवाईक सांगतात.--दुर्मिळातील दुर्मीळ घटना१९८४ ला पाकिस्तानात असेच बाळ जन्माला आल्याची नोंद आहे. हे बाळ २००८ पर्यंत जिवंत होते, परंतु त्यानंतर फारशी माहिती उपलब्ध नाही. अमेरिकेत सुद्धा १९९४ मध्ये या आजाराचे बाळ जन्माला आले होते. जागतिकस्तरावर ही दुर्मिळातील दुर्मीळ घटना असल्याने यावर फारसे संशोधन झाले नाही. विशेष असे उपचारही नाहीत. उपचारात केवळ बाळाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. -डॉ. यश बानाईतबालरोगतज्ज्ञ, लता मंगेशकर हॉस्पिटलहॉस्पिटलच्या बालरोग विभागातील तज्ज्ञ डॉ. यश बानाईत यांनी ‘लोकमत’ला सांगितले, या महिलेची सिझर करून प्रसूती करण्यात आली. जन्मलेले बाळ पाहताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या बाळाला ‘हरक्विलीन’ हा जन्मजात दुर्मिळ आजार आहे. अनेकदा अशा अर्भकाचा गर्भातच मृत्यू होतो किंवा जन्मल्यानंतर असे बाळ जास्त दिवस जगत नाही. हा आनुवंशिक आजार आहे. ‘एबीसीए १२’ नावाच्या जीनमध्ये गडबड झाल्याने हा आजार होतो. यात त्वचा प्रभावित होते. जन्मलेल्या या मुलीची त्वचा फार जाड आणि त्यात भेगा गेल्या आहेत. यामुळे ती दिसायला विचित्र दिसते. नाकाचा आणि डोळ्यांचा पूर्ण विकास झालेला नसल्याने ते पूर्णपणे लाल रंगाचे आहेत. काही ठिकाणी त्वचा इतकी ताणलेली आहे की अवयवांचा विकास झालेला नाही. विशेषत: बोटं गळून पडलेली आहेत. याला ‘अ‍ॅटोअ‍ॅम्पूटेशन’ म्हणतात. त्वचेच्या ताणामुळे बाळाला श्वास घेण्यास अडचण जाते आणि बाळ दगावण्याचे हेच मुख्य कारण ठरते. या शिवाय त्वचेला भेगा पडल्याने ससंर्गाचा धोका निर्माण होऊन मृत्यूचे कारण ठरू शकते. साधारण तीन लाख बालकांमध्ये एखादेच या आजाराचे बाळ जन्माला येते. मध्यभारतातील ही पहिली घटना असावी, कारण या संदर्भात सध्यातरी कुठे नोंद नाही. या महिलेचे हे पहिलेच बाळंतपण होते. प्रसूतीपूर्वी तिने कुठेच सोनोग्राफी केले नसल्याचे तिचे नातेवाईक सांगतात.(प्रतिनिधी)सोनोग्राफी न करणे भोवलेस्त्रीला गर्भधारणेपासून तर प्रसूतीपर्यंत साधारण तीन ते चार वेळा सोनाग्राफी करणे गरजेचे आहे. सोनोग्राफीमुळे बाळाची तब्येत, त्याच्या हालचाली समजतात. यात काही समस्या आढळून आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार केला जातो. मात्र सदर महिलेने सोनोग्राफीच केली नव्हती. तर गर्भपात करता येतो गर्भधारणेपासून सुरुवातीला १८ आठवडे पूर्ण झाल्यानंतर सोनोग्राफी करणे गरजेचे आहे. यावेळी सोनोग्राफी केल्यानंतर बाळामध्ये काही व्यंग आढळल्यास तसेच या व्यंगामुळे ते जिवंत राहत नसल्यास २० आठवड्यापर्यंत कायद्याने त्या मातेचा गर्भपात करता येतो. दुर्मीळ घटना१९८४ ला पाकिस्तानात असेच बाळ जन्माला आल्याची नोंद आहे. हे बाळ २००८ पर्यंत जिवंत होते, परंतु त्यानंतर फारशी माहिती उपलब्ध नाही. अमेरिकेत सुद्धा १९९४ मध्ये या आजाराचे बाळ जन्माला आले होते. जागतिकस्तरावर ही दुर्मिळातील दुर्मीळ घटना असल्याने यावर फारसे संशोधन झाले नाही. विशेष असे उपचारही नाहीत. उपचारात केवळ बाळाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. -डॉ. यश बानाईतबालरोगतज्ज्ञ, लता मंगेशकर हॉस्पिटल