शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

पक्षी सप्ताह : गोरेवाड्यामध्ये पक्ष्यांच्या ५३ प्रजातींचे दर्शन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 00:30 IST

गोरेवाडा तालाव परिसरात पक्षीपे्रमींना विविध ५३ पक्षांच्या प्रजातींचे दर्शन घडले. पक्षी सप्ताहांतर्गत आढळलेल्या या पक्ष्यांच्या संख्येमुळे पक्षीअभ्यासकांचा हुरूप वाढला आहे.

ठळक मुद्दे२० पक्षीनिरीक्षकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोरेवाडा तालाव परिसरात पक्षीपे्रमींना विविध ५३ पक्षांच्या प्रजातींचे दर्शन घडले. पक्षी सप्ताहांतर्गत आढळलेल्या या पक्ष्यांच्या संख्येमुळे पक्षीअभ्यासकांचा हुरूप वाढला आहे. सोबतच गोरेवाडा तलाव पक्षीनिरीक्षकांच्या दृष्टीने आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.तलावाच्या परिसरात करण्यात आलेल्या निरीक्षणामध्ये ५३ प्रकारच्या प्रजातींच्या पक्षांचे दर्शन घडले. यात स्पॉट बिल डक (धनवर बाद्दा), ड्रोनगो (कोतवाल), ब्लॅक रेड स्टार्ट (कृष्णथिरथिरा), कॉमन हूप (हूदहुद्या), ग्रेटर कॉऊकल (भारद्वाज), इंडियन रोलर (नीलकंठ), लाँग टेल्ड स्क्रीक, किंगफिशर आदी पक्ष्यांचे दर्शन घडले.हे पक्षीनिरीक्षण रविवार सकाळी ७ वाजता प्रारंभ झाले. सेव्ह इकोसिस्टम अँड टायगर (सीट) संस्थेच्या माध्यमातून गोरेवाडा जैवविविधता उद्यान व तलाव परिसरातच हे निरीक्षण करण्यात आले होते. पक्षी निरीक्षणाचा प्रारंभ आंतराष्ट्रीय गोरेवाडा पक्षीघराचे संचालक दीपक सावंत यांच्या उपस्थितीमध्ये आणि सीट संस्थेचे अध्यक्ष तेजस पारशिवनीकर यांच्या नेतृत्वात झाला. अगदी सकाळी सकाळी पाणवठ्यावर आलेल्या या पक्ष्यांचे दर्शन त्यांना घडले. पक्षीनिरीक्षकांनी हे पक्षी कॅमेराबंद केले. यात वीरेंद्र लाटनकर, पवन जिवारे, शुभम चापेकर, राजेंद्र रौतिया, पाम चौधरी, गौरव मानकर, अपूर्वा भेंडे, रितिका वालकर, श्वेता बोरकर, योगिता चापेकर, निवेदिता सावंत आदींचा समावेश होता. या दरम्यान वनरक्षक अरविंद मसराम, नीलेश मेंढे, संदीप भलावी, निखिल पांजनकर, ऋषभ सुरडकर आदींनी पक्षीप्रेमींसाठी सहकार्य केले.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यGorewada Zooगोरेवाडा प्राणीसंग्रहालय