शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

नागपूरच्या राजभवन परिसरात घडतेय जैवविविधतेचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:49 IST

हिरवेकंच वृक्षांची दाटीवाटी, त्यावर सुरू असलेला असंख्य पाखरांचा चिवचिवाट, डोळ्यांना आकर्षित करणाऱ्या रंगीबेरंगी फुलांचे गालिचे, त्यावर इकडून तिकडे उडणारे फुलपाखरांचे असंख्य थवे, ऐन उन्हाळ्यातही निसर्गाचे असे वैभव शहराच्या मध्यभागी असलेल्या राजभवनात अनुभवास मिळत आहे. नयनरम्य निसर्गाचा हा अद्भूत थाट खºया अर्थाने पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाची साक्ष देतोय.

ठळक मुद्देपर्यावरण संवर्धनाचा ‘राज’ योग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिरवेकंच वृक्षांची दाटीवाटी, त्यावर सुरू असलेला असंख्य पाखरांचा चिवचिवाट, डोळ्यांना आकर्षित करणाऱ्या रंगीबेरंगी फुलांचे गालिचे, त्यावर इकडून तिकडे उडणारे फुलपाखरांचे असंख्य थवे, ऐन उन्हाळ्यातही निसर्गाचे असे वैभव शहराच्या मध्यभागी असलेल्या राजभवनात अनुभवास मिळत आहे. नयनरम्य निसर्गाचा हा अद्भूत थाट खऱ्या अर्थाने पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाची साक्ष देतोय.पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास हा सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. कारण त्याच्या संवर्धनावर भविष्याची सुरक्षा अवलंबून आहे. याची जाणीव प्रत्येकालाच आहे परंतु कृतीतून ते दिसत नाही. त्यामुळेच शहरात बघावे तिकडे कचºयाचे ढिगारे, प्रदूषण, ओसाड झालेले रस्ते याचाच अनुभव येतोय. शहराची ही अवस्था असताना राजभवनाने मात्र निसर्गाचा अद्भूत वारसा निर्माण केला आहे. यात राजभवनाचे प्रभारी अधिकारी रमेश येवले यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.राजभवनाचा १०० एकरचा परिसर पूर्वी ओसाड पडला होता. पाच टक्के वृक्ष वगळता संपूर्ण परिसर गवताळ होता. सुरक्षा भिंत नसल्याने हा परिसर गायी-म्हशींचे कुरण झाला होता. उन्हाळ्यात लागलेल्या आगींच्या घटनांनी येथील वनसंपदा नष्ट होत होती. अशा परिस्थितीत १९९८ मध्ये जबाबदारी स्वीकारलेल्या येवले यांनी परिसराचा कायापलट करण्याचा निर्धार करून अतिशय नियोजनाने तो यशस्वीही केला. सुरुवात ७५०० सागाच्या वृक्षारोपणाने झाली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांकडून दरवर्षी १००० वृक्ष लागवड करून घेतली. २००८ मध्ये वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी सुरक्षा भिंत बांधण्यात आली. जलसंधारणाचे छोटे-मोठे बंधारे व दोन वनतळे या परिसरात बांधण्यात आले. राजभवनाच्या १०० एकरच्या परिसरात विशेष संकल्पनेतून जैवविविधता उद्यानाची निर्मिती करण्यात आली. बर्ड रेस्टॉरेंट पक्ष्यांसाठी वरदान२०११ मध्ये परिसराचा सर्वे केला असता तेव्हा १६४ प्रजातीचे पक्षी येथे आढळले. उन्हाळ्याच्या भीषण गरमीत पक्ष्यांच्या खाद्यासाठी बर्ड रेस्टॉरेंटची संकल्पना राबविण्यात आली. दरवर्षाला येथे पक्ष्यांना ४० ते ४५ पोती धान्य खायला घालण्यात येते. ही संकल्पना पक्ष्यांसाठी वरदान ठरली असून सकाळी, संध्याकाळी वेगवेगळ्या प्रजातीच्या पक्ष्यांचे थवे येथे जमतात. राजभवनाचा परिसर मोरांचा अधिवासराजभवनाचा परिसर मोरांचे अधिवास झाले आहे. परिसरात प्रवेश करताच रस्त्यावरून अनेक मोरांचे सहज दर्शन होते. खास फुलपाखरांसाठी बनविण्यात आलेल्या उद्यानात रंगीबेरंगी फुलपाखरांचे थवे बघायला मिळतात. सालिंदर, मसन्याऊदसारखे प्राणी मुक्कामाला असतात. जणुकाही येथे निसर्गाचे जीवनचक्रच तयार झालेले आहे. पर्यावरण म्हणजे काय तर आॅक्सिजन, आॅक्सिजन येतो कुठून तर झाडांपासून. मी राजभवनात सेवा देताना निसर्ग व पर्यावरण संवर्धनातून असंख्य झाडे लावून एकप्रकारे पुढच्या पिढीसाठी आॅक्सिजन मिळण्याची छोटीशी व्यवस्था केली आहे. याचे मला खूप समाधान आहे.रमेश येवले, प्रभारी अधिकारी, राजभवन 

 

टॅग्स :nagpurनागपूर