शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
4
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
5
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
6
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
7
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! वैभव सूर्यवंशीची झंझावती खेळी, मैदानात पाडला षटकारांचा पाऊस
8
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
9
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
10
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
11
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
12
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
13
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
14
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
15
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
16
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
17
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
18
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
19
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
20
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!

तीन अस्तित्वहीन प्रतिष्ठानांचा ‘जीएसटी’ला कोट्यवधींचा चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 10:32 IST

Nagpur News तीन अस्तित्वहीन प्रतिष्ठानांनी बोगस पद्धतीने इनपूट टॅक्स क्रेडिटचे रिफंड घेऊन सीजीएसटी विभागाला १२४ कोटी रुपयांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्दे१२४ कोटींचे बोगस रिफंड ९० कोटींचे बिल रोखले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तीन अस्तित्वहीन प्रतिष्ठानांनी बोगस पद्धतीने इनपूट टॅक्स क्रेडिटचे रिफंड घेऊन सीजीएसटी विभागाला १२४ कोटी रुपयांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. डायरेक्टरेट जनरल ऑफ गुड्स एंड सर्व्हिस टॅक्स इंटेलिजेंस (डीजीजीआय) च्या नागपूर झोन युनिटला हा गैरप्रकार लक्षात येताच, त्यांनी तातडीने कारवाई करीत उर्वरित ९० कोटी रुपयांच्या रिफंडचे बिल थांबविले. याचे मास्टरमाइंड फरिदाबादचे रहिवासी असून, त्यांना शुक्रवारी नागपूरला चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे. इतर संबंधित फरार आहेत.

नागपूरमध्ये बोगस बिल रॅकेट सक्रिय असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारावर डीजीजीआय नागपूर झोन युनिटच्या पथकाने १ जुलै रोजी नागपुरात अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. दरम्यान, तीन अस्तित्वहीन प्रतिष्ठानांनी निर्यातक बनून मिहान आयसीडीतून निर्यात दाखवून गैरप्रकाराने सीजीएसटी डिव्हिजन हिंगणा येथून कोट्यवधी रुपयांचे इनपूट टॅक्स क्रेडिटचे रिफंड मिळविले. हे तीनही प्रतिष्ठान कागदावरच हाेते. रजिस्ट्रेशनच्या केवळ तीन महिन्यांनीच या तिन्ही अस्तित्वहीन प्रतिष्ठानांनी शिपिंग बिल जमा केले. यात पाइप्स आणि सिगारेटमधील स्मोकिंग मिक्सरची निर्यात केल्याचे दाखविले. या उत्पादनांवर २८ टक्के जीएसटी आणि २९० टक्के कंपन्सेशन सेस लागतो. प्रतिष्ठानांनी या आधारावर २१३.८७ कोटी रुपयांचे इनपूट टॅक्स क्रेडिटचे रिफंड जीएसटी विभाग हिंगणा यांच्याकडे मागितले. यावर विभागाने १२३.९७ कोटी रुपयांचे रिफंड देऊनही टाकले. धाडीदरम्यान हा गैरव्यवहार उघडकीस आला. तेव्हा डीजीजीआय युनिटने लगेच उर्वरित ८९.९० कोटी रुपयांचे रिफंड रोखले.

अधिकाऱ्यांवरही कारवाईची शक्यता

सूत्रानुसार अस्तित्वहीन प्रतिष्ठानांना १२४ कोटी रुपयांचे आयटीसी रिफंड देण्यात आल्याने अधिकारीही संशयाच्या घेऱ्यात आले आहेत. त्यांचीही चौकशी होऊ शकते. डीजीजीआय नागपूर झोन युनिटच्या चौकशीत सीजीएसटी हिंगणा विभागातील संबंधित अधिकारी दोषी आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध विभागीय कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीGSTजीएसटी