शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
4
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
5
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
6
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
7
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
8
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
9
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
10
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
11
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
12
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
13
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
14
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
15
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
16
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
17
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
18
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
19
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
20
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'

कोट्यवधीचा गोलमाल

By admin | Updated: May 21, 2015 02:19 IST

नागपूर टिंबर मर्चंट असोसिएशनशी संबंधित कोट्यवधीच्या अपहार प्रकरणी गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने बुधवारी असोसिएशनच्या कार्यालयासह नऊ ठिकाणी धाड टाकली.

नागपूर : नागपूर टिंबर मर्चंट असोसिएशनशी संबंधित कोट्यवधीच्या अपहार प्रकरणी गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने बुधवारी असोसिएशनच्या कार्यालयासह नऊ ठिकाणी धाड टाकली. या कारवाईमुळे टिंबर व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. हे प्रकरण २००८ ते २०११ दरम्यान घडलेले आहे. सूत्रांनुसार टिंबर मर्चंट असोसिएशनच्या भवनासाठी जागेची आवश्यकता होती. असोसिएशनचे अध्यक्ष व ट्रस्टींनी सदस्यांची परवानगी न घेता जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ट्रस्टींनी कृष्ण कृपा डेव्हलपर्सची स्थापना केली. जमीन खरेदीसाठी असोसिएशनने फिक्स डिपॉझिट योजनेला मध्येच बंद करून त्यातील ४२ लाख ३० हजार रुपये कृष्ण कृपा डेव्हलपर्सला जारी करण्यात आले. डेव्हलपर्सला दिलेला निधी योग्य असल्याचे दर्शविण्यासाठी एका दाम्पत्याच्या जमिनीचे बोगस करार करून ती जागा खरेदी करण्यात आल्याचे खोटे दस्ताऐवज तयार केले. कृष्ण कृपा डेव्हलपर्सच्या माध्यमातून एक कोटी रुपयांमधून १० एकर जागा खरेदी करण्यात आली. १० एकरपैकी ३० हजार फूट जमीन असोसिएशनला ३४ लाख रुपयात विकण्यात आली. उर्वरित ८ लाख रुपये परत केले. उर्वरित जमीन कृष्ण कृपा डेव्हलपर्सच्या संचालकांनी प्लॉट तयार करून विकले. हे संचालक नागपूर टिंबर मर्चंट असोसिएशनचेही ट्रस्टी होते. हा अपहार उघडकीस आल्यावर असोसिएशनचे सदस्य हसमुख पटेलयांनी गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी असोसिएशनचे अध्यक्ष प्रभूदास पटेल, जयंती पटेल, गोविंद पटेल आणि लखमशी पटेल यांना आरोपी बनविले. एफआरआय रद्द करण्याच्या मागणीसाठी आरोपी उच्च न्यायालयात गेले. परंतु त्यांना तेथून मदत मिळाली नाही. या दरम्यान गुन्हे शाखा पोलिसांनी धर्मादाय आयुक्तांकडून असोसिएशनचे संपूर्ण अंकेक्षण करण्याचे आदेश मिळविले. पूर्ण अंकेक्षणात असोसिएशनद्वारा करण्यात आलेले इतर अपहारही समोर आले. असोसिएशनद्वारा टिंबर भवनला भाड्यावर देण्यात आल्यानंतर येणाऱ्या रकमेतही अपहार झाल्याचे सांगितले जाते. पूर्ण अंकेक्षणात लोकांना वितरित करण्यात आलेल्या रकमांच्या बोगस रसिदा सुद्धा जप्त करण्यात आल्या. अशा लोकांचे बयाणसुद्धा नोंदविण्यात आले. या आधारावर नऊ ट्रस्टींच्या विरोधात अपहाराचा नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यालाही ट्रस्टींनी न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने दोन्ही प्रकरण एकत्र करण्याचे आदेश देत चौकशीवर लावलेली बंदी हटविली आहे. त्यामुळे आर्थिक शााखेने नव्याने चौकशी सुरू केली. यादरम्यान नऊ आरोपींच्या घरांवर, असोसिएशनचे लकडगंज येथील कार्यालय आणि कृष्ण कृपा डेव्हलपर्सच्या कार्यालयावर धाड टाकली. येथून रजिस्ट्री, मिनिट बुक, पावती, आॅडीट रिपोर्ट, विक्री जप्त करण्यात आले. (प्रतिनिधी)