शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील क्वारंटाईन केंद्रातील जेवण व साहित्याचे बिल अडीच कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 20:35 IST

कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी शहरात करण्यात आलेल्या क्वारंटाईन केंद्रांच्या व्यवस्थेसाठी पुरविण्यात आलेल्या गाद्या, उशा, बेडशीट व पॅकिंग अशा बिलांचा बोजा अधिक आहे. तर मोफत भोजन व्यवस्था झाल्याने महापालिकेचा खर्च वाचला आहे. त्यामुळे राज्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत नागपूर मनपाचा खर्च कमी असून आजवर जवळपास २.५० कोटी खर्च झाले आहेत.

ठळक मुद्देमोफत भोजन व्यवस्था झाल्याने खर्च कमी : गाद्या, बेडशीट व पॅकिंगच्या बिलाचा अधिक बोजा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी शहरात करण्यात आलेल्या क्वारंटाईन केंद्रांच्या व्यवस्थेसाठी पुरविण्यात आलेल्या गाद्या, उशा, बेडशीट व पॅकिंग अशा बिलांचा बोजा अधिक आहे. तर मोफत भोजन व्यवस्था झाल्याने महापालिकेचा खर्च वाचला आहे. त्यामुळे राज्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत नागपूर मनपाचा खर्च कमी असून आजवर जवळपास २.५० कोटी खर्च झाले आहेत.शहरात कोरोना साथ सुरू झाल्यावर क्वारंटाईन केंद्रांची व्यवस्था करण्यात आली. नागपुरात व्हीएनआयटी, आमदार निवास, सिम्बॉयसिस, पाचपावली, वनामती, आरपीटीएस, राजनगर, नीरी आदी ठिकाणी व्यवस्था करण्यात आली. या ठिकाणी दाखल होणाऱ्या नागरिकांची व्यवस्था करण्यात आली. सुरुवातीला जिल्हा प्रशासनातर्फे जेवणाची व्यवस्था करण्यात आली. प्रतिव्यक्ती दिवसाला ६०० रुपये खर्च येत होता. २ मेपासून ही व्यवस्था महापालिकेकडे आली. त्यानंतर प्रति व्यक्ती १५९ रुपये दराने निविदा काढण्यात आली. २ ते २५ दरम्यान यासाठी मनपाने ७५.७५ लाख रुपये खर्च केले. त्यानंतर २६ मेपासून राधास्वामी सत्संग मंडळाकडे मोफत जेवणाची व्यवस्था देण्यात आली. मनपाकडे चहा, बिस्किट व पिण्याचे पाणी पुरवण्याची जबाबदारी आहे. यावर प्रतिव्यक्ती ५२.४७ रुपये दराने खर्च केला जात आहे. यावर जून अखेरीस ३२.३८ लाख रुपये खर्च करण्यात आले. तसेच राधास्वामी सत्संग येथून जेवण मोफत मिळत असले तरी पॅकिंग खर्च मनपाला करावा लागत आहे. प्रति पॅकिंग १२.५८ रुपये दराने ७.८१ लाख रुपये खर्च करण्यात आले.खर्चाची मोठी बचतक्वारंटाईन सेंटरवर नागरिकांना जेवण, गाद्या, उशा, बेडशीट, बकेट, मग, झाडू, डस्टबिन, टॉवेल असे साहित्य पुरविले. यावर सुमारे २.५० कोटी रुपये खर्च करण्यात आला. क्वारंटाईन केंद्राच्या व्यवस्थेच्या बिलाबाबत विचारले असता अतिरिक्त आयुक्त राम जोशी म्हणाले की, राधास्वामी सत्संग मंडळामुळे मनपाचा जेवनावरील खर्च मोठ्या प्रमाणात वाचला आहे. सॅनिटायझर, मास्क सेवाभावी संस्थांकडून मिळाले आहेत. यात मनपाची बचत झाली.दररोज प्रतिव्यक्ती ५२.४७ रुपये खर्चक्वारंटाईन केंद्राच्या व्यवस्थेवर जवळपास २.५ कोटी खर्च आला आहे. जेवण मोफत असले तरी चहा, बिस्किट व पॅकिंग, वाहतूक यावर मनपा खर्च करीत आहे. दर दिवसाला प्रतिव्यक्ती ५२.४७ रुपये खर्च होत आहेत. तसेच पॅकिंगवर प्रति पॅकिंग १२.५८ रुपये खर्च होत आहेत. २ मेपासून महापालिकेकडे ही जबाबदारी आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या