शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपात मोठा ‘स्पेअर पार्ट’ खरेदी घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 21:46 IST

महापालिकेत दोन वर्षात २ कोटी ३१ लाखांच्या साहित्याची चढ्याभावाने खरेदी करण्यात आली. यात कोट्यवधीचा घोटाळा असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.

ठळक मुद्दे१० हजारांचा व्हॉल्व्ह ७० हजारालाकोट्यवधींचा आर्थिक बोजा वाढलाकारखाना विभागात अनागोंदी

आॅनलाईन लोकमतनागपूर :महापालिकेच्या सेवेतील वाहनांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी कारखाना विभागावर आहे. दुरुस्तीसाठी खरेदी करण्यात आलेल्या स्पेअरपार्टची (साहित्य) किंमत आणि याचीच खुल्या बाजारातील किंमत यात प्रचंड तफावत आहे. वाहनांसाठी लागणारे टायर, ट्यूब, बॅटरी, कपलींग, एक्सव्हेटर अशा साहित्याची खरेदी दामदुप्पट किमतीत केली जात आहे. मागील काही वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. दोन वर्षात २ कोटी ३१ लाखांच्या साहित्याची चढ्याभावाने खरेदी करण्यात आली. यात कोट्यवधीचा घोटाळा असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.महापालिकेची लहानमोठी २०१ वाहने आहेत. या वाहनांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी कारखाना विभागावर आहे. गेल्या दोन वर्षात वाहनांच्या दुरुस्तीवर २ कोटी ३१ लाखांचा खर्च करण्यात आला. परंतु बाजारभावाच्या तुलनेत दुप्पट, तिप्पट किमतीने साहित्याची खरेदी करण्यात आली. टाटा कंपनीची गाडी इएक्स-२५१५ चे एमआरएफ कंपनीचे टायर ३५,९५० रुपये दराने खरेदी केले. परंतु खुल्या बाजारात याच टायरची किंमत १४ हजार ८०० रुपये आहे. एमआरएफचा रिडायल टायर ८५ हजार ४५६ रुपये दराने खरेदी करण्यात आला आहे. बाजारात याच टायरची किंमत १८ हजार ४०० रुपये आहे. टाटा सुमोसाठी लागणारी बॅटरी (१२ होल्ट) १८ हजार ५०० रुपये दराने खरेदी केली आहे. बाजारात याच बॅटरीची किंमत ५ हजार ३९० रुपये आहे. जेसीबीसाठी लागणारी बॅटरी २९ हजार ५७० रुपये दराने खरेदी केले जात आहे. बाजारात या बॅटरीची किंमत १२ हजार ७०० रुपये आहे. जेसीबीसाठी लागणारे इंजिन आॅईल फिल्टरची बाजार किंमत ६०० रुपये आहे. परंतु कारखाना विभागाने ५ हजार ८४२ रुपये दराने खरेदी केली आहे. डिझेल फिल्टरची प्रत्येकी १५ हजार ७८४ रुपयाला खरेदी करण्यात आली. बाजारात किंमत ५५० रुपये आहे. ४ हजार ५०० रुपये किमतीचा खिडकीचा काच ११ हजार २७४ रुपयाला खरेदी करण्यात आला. एक्सव्हेटरसाठी लागणाऱ्या  व्हाल्वची किंमत १० हजार असताना तो ६९ हजार ६८३ रुपयांना खरेदी करण्यात आला आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूर