शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

नागपुरात आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम : ११० स्कूल बसवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 20:43 IST

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने कंबर कसली आहे. १ ते १५ आॅक्टोबर दरम्यान स्कूल बसची तपासणी मोहीम हाती घेतली होती. यात १०५ स्कूल बस व विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या पाच अवैध वाहनांवर कारवाई करीत २.०१ लाखांचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देशहर आरटीओची कारवाई : २.०१ लाखांचा दंडलोकमतचा प्रभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने कंबर कसली आहे. १ ते १५ आॅक्टोबर दरम्यान स्कूल बसची तपासणी मोहीम हाती घेतली होती. यात १०५ स्कूल बस व विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या पाच अवैध वाहनांवर कारवाई करीत २.०१ लाखांचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.न्यायालयाचा आदेश व परिवहन विभागाच्या निर्देशानुसार शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत (आरटीओ) स्कूलबस व स्कूल व्हॅनची वाहन योग्यता तपासणी दरवर्षी करणे बंधनकारक आहे़ उन्हाळी सुट्यांच्या कालावधीत फेरतपासणी करण्याबाबत परिवहन विभागाच्या सूचना आहेत. परंतु स्कूल बसच्या फिटनेसला घेऊन स्कूलबस मालक गंभीर नसल्याचे चित्र आहे. नागपूर शहर आरटीओ कार्यालयांतर्गत ८२६ स्कूल बस नोंदणीकृत आहेत. यातील ६८३ स्कूल बसेसला ‘फिटनेस’ प्रमाणपत्र देण्यात आले आहे. उर्वरित १४३ स्कूल बसने अद्यापही हे प्रमाणपत्र घेतले नसल्याने ‘आरटीओ’ कार्यालयाने काही महिन्यांपूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावली. परंतु त्यानंतरही या स्कूल बसेस फिटनेस तपासणीसाठी आल्या नव्हत्या. विशेष म्हणजे, यातील बहुसंख्य स्कूल बसेस विद्यार्थ्यांची ने-आण करीत असल्याने त्या धोकादायक ठरत होत्या. या संदर्भाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. याची दखल घेत गेल्या १ ते १५ आॅक्टोबरदरम्यान स्कूल बस तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यात २७५ स्कूल बस व व्हॅनची तपासणी करण्यात आली. यात १०५ स्कूलबस व विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणारी पाच अवैध वाहने दोषी आढळून आली. यातील काही बसेस जप्त करून त्रुटी दूर केल्यावरच त्यांना सोडण्यात आले. आरटीओच्या वायुवेग पथकाने केलेल्या धडक कारवाईने स्कूल बस चालकांचे धाबे दणाणले आहे.स्कूल बस तपासणी मोहीम सुरू राहणारस्कूल बस तपासणी वायुवेग पथकाकडून सुरू राहणार आहे. दोषी आढळून येणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. यामुळे स्कूल बस चालकांनी आपले वाहन नियमानुसार करावे व वाहतूकीचे सर्व नियम पाळावे.अतुल आदे,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर

टॅग्स :SchoolशाळाBus Driverबसचालक