शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक नियुक्त्यांमध्ये मोठा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 21:50 IST

शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये मोठा घोटाळा सुरू असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. शिक्षणाधिकारी व शाळा व्यवस्थापन हातमिळवणी करून अवैध पद्धतीने नियुक्ती प्रक्रिया राबवित आहेत. त्यामुळे ते दोघेही मालामाल होत आहेत, पण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या अनियमिततेच्या जात्यात भरडले जात आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही बाब गंभीरतेने घेऊन याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाची गंभीर दखल : स्वत: दाखल केली जनहित याचिका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शालेय शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये मोठा घोटाळा सुरू असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. शिक्षणाधिकारी व शाळा व्यवस्थापन हातमिळवणी करून अवैध पद्धतीने नियुक्ती प्रक्रिया राबवित आहेत. त्यामुळे ते दोघेही मालामाल होत आहेत, पण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या अनियमिततेच्या जात्यात भरडले जात आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही बाब गंभीरतेने घेऊन याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये बेकायदेशीर प्रकार सुरू आहे. एका विशिष्ट पद्धतीने ही प्रक्रिया राबविली जात आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा असल्यास, त्या जागा भरण्याची परवानगी मिळावी यासाठी शाळा व्यवस्थापन शिक्षणाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करते. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाला स्वत:च्या जबाबदारीवर नियुक्त्या करण्याची परवानगी दिली जाते. त्यानुसार शाळा व्यवस्थापनाद्वारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या नियुक्त्या केल्या जातात. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी २-३ वर्षे नोकरी केल्यानंतर वरिष्ठ अधिकारी काहीतरी त्रुटी काढून त्यांच्या नियुक्त्यांची मान्यता रद्द करते. नियुक्त्यांतील अनियमिततेसाठी शिक्षणाधिकाऱ्यांवर काहीच कारवाई केली जात नाही. त्याऐवजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बळी घेतले जातात. त्यानंतर नियुक्त्यांचे चक्र परत सुरू होते. नियुक्त्यांमध्ये पुन्हा तिच प्रक्रिया राबविली जाते. नियुक्त्यांची मान्यता रद्द झाल्यानंतर रिक्त जागा भरण्यासाठी शाळा व्यवस्थापन परत प्रस्ताव सादर करते व त्यांना स्वत:च्या जबाबदारीवर नियुक्त्या करण्याची परवानगी दिली जाते.या घोटाळ्यात फसलेल्या अनेक पीडित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी न्याय मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांचे प्रकरण ऐकल्यानंतर नियुक्त्यांमधील अनियमितता प्रकाशात आली. त्यामुळे न्यायालयाने याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी हे प्रकरण जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतले. तसेच, याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी अ‍ॅड. पी. ए. जीभकाटे यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली.सरकारला मागितले स्पष्टीकरणउच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांनी राज्य सरकारला नोटीस बजावून यावर स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला आहे. प्रकरणावर २६ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. सरकारच्या उत्तराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTeacherशिक्षक