शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
4
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
5
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
6
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
7
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
8
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
9
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
10
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
11
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
12
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
13
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
14
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
15
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
16
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
17
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
18
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
19
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
20
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...

बसपाच्या ‘हत्ती’वर बंडखोराची स्वारी

By admin | Updated: February 7, 2017 01:46 IST

काँग्रेस व भाजप एकाच शिक्क्याचे दोन रूप असल्याचे सांगणाऱ्या बसपाने नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या बंडखोर उमेदवारांना अनेक जागांवर हात देत हत्तीवर स्वार केले आहे.

इच्छुकांनी बनविले पॅनल : भाजपनेही पळविला बसपाचा उमेदवार नागपूर : काँग्रेस व भाजप एकाच शिक्क्याचे दोन रूप असल्याचे सांगणाऱ्या बसपाने नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या बंडखोर उमेदवारांना अनेक जागांवर हात देत हत्तीवर स्वार केले आहे. तर उत्तर नागपुरातील बसपातील बंडखोर कार्यकर्त्यांनी बहन मायावती विचार मंच स्थापन करून या पॅनल अंतर्गत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे भाजपनेही एका प्रभागातून बसपाचा उमेदवार पळवून आपल्या तिकिटावर उभा केला आहे. बसपाच्याच काही कार्यकर्त्यांनुसार उत्तर नागपुरातील प्रभाग क्रमांक १ येथून बसपाचे अनुसूचित जातीचे उमेदवार असलेले नितीन नागदेवते हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून बसपात सामील झाले. त्यांना पक्षाने उमेदवारी बहाल केली. याशिवाय याच प्रभागातील मनीष बन्सोड हे भीमसेनेचे कार्यकर्ते आहेत. प्रभाग क्रमांक २ येथून रिना साळवे या भीमसेनेचे नेते श्रीधर साळवे यांच्या पत्नी आहेत. भीमसेनेने या निवडणुकीत बसपाला समर्थन जाहीर केले होते. या दोन्ही प्रभागात पक्षाकडून इच्छुक उमेदवारांची यादी मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांना डावलून बाहेरच्या उमेदवारांना तिकीट दिल्याने पक्षातील उत्तर नागपुरातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. यासोबतच बसपाचे प्रदेश सचिव उत्तम शेवडे हे बसपाचे नागपूर शहरातील चेहरे म्हणून ओळखले जातात. त्यांनी प्रभाग ३३ मधून उमेदवारी मागितली होती. परंतु पक्षाने त्यांचे तिकीट कापून दुसऱ्या प्रभागातील उमेदवाराला तिकीट दिली. भाजपही यात मागे नाही. दक्षिण नागपुरातील प्रभाग ३५ येथून गेल्या निवडणुकीत बसपाकडून निवडणूक लढविणाऱ्या आणि दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्यानीलेश कुंभारे यांना भाजपने पळविले असून आपल्या तिकिटावर उभे केले आहे. (प्रतिनिधी)संघ स्वयंसेवकालाही तिकीट भाजपमधील असंतुष्टांसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका स्वयंसेवकालाही बसपाने दक्षिण नागपुरातील एका प्रभागातून तिकीट दिले आहे. अतुल सेनाड असे त्यांचे नाव असून त्यांनी अगोदर भाजपमधून उमेदवारी मागितली होती. परंतु त्यांना भाजपचे तिकीट न मिळाल्याने त्यांनी बसपाचे तिकीट मिळविले. प्रभाग ३१ सर्वसाधारण प्रवर्गातून ते लढत आहेत. कार्यकर्ते नाराज पक्षाचे तिकीट न मिळाल्याने बसपातील अनेक कार्यकर्ते संतापले आहेत. पक्षातील प्रदेश नेतृत्वावर ते आपली नाराजी व्यक्त करीत आहेत. असेच बसपाच्या उत्तर नागपूर विधानसभेचे महासचिव असलेले नरेंद्र गायकवाड यांनी बसपामध्ये प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. मी गेल्या १७ वर्षांपासून पक्षात काम करीत आहे. प्रत्येक वेळा मी तिकीट मागितले परंतु मला नेहमीच ते नाकारण्यात आले. आम्हाला पाच वर्षे शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार सांगितले जातात आणि निवडणूक आली की प्रामाणिक कार्यकर्त्यांना विचारतसुद्धा नाही, असेही त्यांनी पाठविलेल्या पत्रकात म्हटले आहे.