शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भूषण धर्माधिकारी मुख्य न्यायमूर्ती : नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 20:56 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नागपूरचे सुपुत्र न्या. भूषण धर्माधिकारी यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची केंद्र सरकारला शिफारस केली आहे. त्यामुळे नागपूरच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे.

ठळक मुद्देकॉलेजियमची शिफारस

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नागपूरचे सुपुत्र न्या. भूषण धर्माधिकारी यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची केंद्र सरकारला शिफारस केली आहे. त्यामुळे नागपूरच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे.न्या. धर्माधिकारी हे मुंबई उच्च न्यायालयातील पहिल्या क्रमांकाचे वरिष्ठ न्यायमूर्ती असून ते सध्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग २३ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे हे पद रिक्त झाले आहे. २४ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमची बैठक पार पडली. त्यात झालेल्या निर्णयानुसार न्या. धर्माधिकारी यांची मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली. ही शिफारस मंजूर झाल्यानंतर न्या. धर्माधिकारी २७ एप्रिलपर्यंत मुख्य न्यायमूर्ती राहतील. या दिवशी ते सेवानिवृत्त होणार आहेत.२८ एप्रिल १९५८ रोजीचा जन्म असलेले न्या. धर्माधिकारी यांची १५ मार्च २००४ रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दोन वर्षानंतर, म्हणजे १२ मार्च २००६ रोजी त्यांना न्यायमूर्तीपदी कायम करण्यात आले होते. नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयातून एलएल. बी. पदवी मिळविल्यानंतर त्यांनी ऑक्टोबर-१९८० पासून वकिली व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यांनी १९८४ पर्यंत अ‍ॅड. एच. एस. घारे यांच्या हाताखाली वकिली केली. त्यानंतर ते स्वतंत्रपणे वकिली करायला लागले. न्यायमूर्तीपदी नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी विविध न्यायालयांमध्ये विविध प्रकारची प्रकरणे हाताळली. ते हायकोर्ट बार असोसिएशनचे ग्रंथालय प्रभारी व कोषाध्यक्ष होते. तसेच, त्यांनी ज्युडिशियल ऑफिसर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये अतिथी व्याख्याते म्हणूनही सेवा दिली आहे.दोन्ही न्यायालयांत नागपूरकर प्रमुखसर्वोच्च न्यायालयामध्ये नागपूरकर न्या. शरद बोबडे प्रमुख न्यायमूर्ती आहेत तर, मुंबई उच्च न्यायालयात न्या. भूषण धर्माधिकारी हे मुख्य न्यायमूर्ती होणार आहेत. ही बाब नागपूरकरांना दुहेरी अभिमान प्रदान करणारी आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय