शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाला चाकू मारणाऱ्या भुसेला अडीच वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 00:40 IST

Police stabbed case conviction पोलीस अधिकाऱ्यावर चाकूने हल्ला करणारा आरोपी बळीराम नरेंद्र भुसे (५२) याला सत्र न्यायालयाने बुधवारी अडीच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देसत्र न्यायालयाचा निर्णय : मार्च-२०१८ मधील घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : पोलीस अधिकाऱ्यावर चाकूने हल्ला करणारा आरोपी बळीराम नरेंद्र भुसे (५२) याला सत्र न्यायालयाने बुधवारी अडीच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. न्या. अभिजित देशमुख यांनी हा निर्णय दिला. भुसे हा वरुड, जि. अमरावती येथील रहिवासी आहे.

प्रवीण घोडाम असे फिर्यादीचे नाव असून घटनेच्या वेळी ते विशेष शाखेत पाेलीस उपनिरीक्षकपदी कार्यरत होते. ४ मार्च २०१८ रोजी शिवजयंती होती. कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी महाल येथील शिवाजी पुतळा परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. घोडाम तेथे हजर होते. दरम्यान, भुसे हातात चाकू घेऊन त्या परिसरात फिरत होता. त्याची माहिती मिळाल्यानंतर घोडाम यांनी भुसेकडे जाऊन त्याला चाकू फेकण्यास सांगितले. परंतु, त्याने ऐकले नाही. त्यामुळे घोडाम यांनी भुसेला पकडण्याचा प्रयत्न केला असता भुसेने घोडाम यांच्यावर चाकूने वार केला. त्यामुळे घोडाम यांच्या उजव्या हाताला गंभीर जखम झाली. त्यानंतर इतरांच्या मदतीने भुसेला पकडून चाकू हिसकावण्यात आला. गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा नोंदवून भुसेला अटक केली. न्यायालयात सरकारतर्फे ॲड. श्याम खुळे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :District Session court of Nagpurनागपूर जिल्हा व सत्र न्यायालय