शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भीमा कोरेगावचे धागेदोरे नागपुरात; पुणे पोलिसांचा अ‍ॅड. गडलिंग यांच्या घरावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 13:16 IST

भीमा कोरेगाव जातीय दंगलीत महत्त्वाची भूमिका वठविल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी येथील अ‍ॅड.सुरेंद्र गडलिंग यांच्या घरी आज मंगळवारी पहाटे छापा घातला.

ठळक मुद्देफ्रंटल आॅर्गनायझेशनचा भीमा कोरेगाव दंगलीत सक्रीय सहभागपहाटेच घातला छापा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भीमा कोरेगाव जातीय दंगलीत महत्त्वाची भूमिका वठविल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी येथील अ‍ॅड.सुरेंद्र गडलिंग यांच्या घरी आज मंगळवारी पहाटे छापा घातला. पुणे पोलिसांच्या दोन पथकांतीलअधिकारी, कर्मचारी स्थानिक पोलिसांच्या मदतीने अ‍ॅड. गडलिंग यांच्या घरात तपासणी करीत होते.विशेष म्हणजे, अ‍ॅड. गडलिंग हे गडचिरोली-गोंदियातील माओवादी आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या बाजूने नेहमीच वकिलपत्र घेतात. नागपूर -विदर्भातील फ्रंटल आॅर्गनायझेशनवर नक्षलविरोधी अभियान तसेच स्थानिक पोलीस अनेक वर्षांपासून नजर ठेवून आहे. गडचिरोली-गोंदियातील फ्रंटल आॅर्गनायझेशनने पुणे, मुंबई, नाशिकसह विविध ठिकाणी जाळे विणल्याच्या अधून मधून बातम्या येतात. भीमा कोरेगाव प्रकरणात उसळलेल्या दंगलीत फ्रंटल आॅर्गनायझेशनने सक्रीय भूमीका वठविल्याची माहिती पुणे पोलिसांनी संकलित केल्याचे समजते. या दंगलीत नागपुरातून काही जणांनी महत्त्वाची भूमिका वठविल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर पुणे पोलिसांची दोन पथके आज पहाटे नागपुरात धडकली. त्यांनी स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून अ‍ॅड. गडलिंग यांच्या इंदोरा येथील निवासस्थानी छापा घातला. वृत्त लिहिस्तोवर तेथे नेमके काय हाती लागले, ते स्पष्ट होऊ शकले नाही.

 

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव