शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल चळवळीत सक्रिय असल्याच्या संशयावरून भट्टाचार्य जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 22:04 IST

नक्षल चळवळीत सक्रिय असल्याच्या संशयावरून शहरातील रहिवासी तुषार क्रांती भट्टाचार्य यांना गुजरात पोलिसांनी अटक केली. कोलकाता येथे राहणा-या बहिणीला भेटून नागपूरकडे परत येत असताना गुजरात पोलिसांनी गोंदियाजवळ धावत्या रेल्वेगाडीत भट्टाचार्य यांना अटक केली.

नागपूर, दि. 8 - नक्षल चळवळीत सक्रिय असल्याच्या संशयावरून शहरातील रहिवासी तुषार क्रांती भट्टाचार्य यांना गुजरात पोलिसांनी अटक केली. कोलकाता येथे राहणा-या बहिणीला भेटून नागपूरकडे परत येत असताना गुजरात पोलिसांनी गोंदियाजवळ धावत्या रेल्वेगाडीत भट्टाचार्य यांना अटक केली. त्यांना नंतर नागपुरात आणून विमानाने अहमदाबादला नेण्यात आले. बुधवारी त्यांना सुरतच्या कोर्टात हजर केले जाणार असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, गुजरात पोलिसांनी त्यांचे अपहरण केल्याचा आरोप भट्टाचार्य यांच्या आप्तजनांनी लावला आहे. या कारवाईची आम्हाला सूचनाही देण्यात आली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.भट्टाचार्य यांच्या विरुद्ध गुजरात पोलिसांनी २०१० मध्ये नक्षली चळवळीचा प्रचार करण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला होता. मात्र, त्यांना अटक करण्यात आली नसल्यामुळे त्यांना फरार घोषित करण्यात आले होते. परंतू, भट्टाचार्य हैदराबादमध्ये शिकत असताना १९७० मध्ये  ते विद्यार्थी आंदोलनात सक्रिय असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात भट्टाचार्य यांच्यावर २००७ मध्ये कोर्टात केस दाखल झाली. सुनावणी दरम्यान २००८ ते २०१३ पर्यंत ते आंध्रप्रदेशातील चेरलापल्ली कारागृहात बंद होते. ते कारागृहात बंदिस्त असतानाच २०१० मध्ये गुजरात पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदविला अन् त्यांना फरारही घोषित केले. त्यामुळे खुद्द भट्टाचार्य यांनी ९ मे २०११ आणि २२ जुलै २०११ ला सूरत न्यायालयाला पत्र लिहून आपण फरार नाही, कारागृहात आहो, अशी माहिती दिली होती. दरम्यान, २०१३ मध्ये सर्व प्रकरणातून मुक्तता झाल्यामुळे आंध्रप्रदेशातील कारागृहातून बाहेर आल्यानंतर भट्टाचार्य नागपुरातील निवासस्थानी राहू लागले. उपजिवेकेसाठी ते प्रसारमाध्यमात अधूनमधून लेख लिहीत असल्याचे कुटुंबीय सांगतात. काही दिवसांपूर्वी ते बहिणीला भेटण्यासाठी कोलकाता येथे गेले होते. परत येत असताना त्यांना मंगळवारी भल्या सकाळी धावत्या रेल्वेगाडीत गुजरात पोलिसांनी त्यांना अटक केली.