शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘भारिप’चा राष्ट्रवादीला पाठिंब्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 22:10 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील भारिप-बहुजन महासंघाने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारास पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. केवळ नाना पटोले उमेदवार असतील तरच समर्थन देण्यात येईल, अन्यथा पक्षाकडून स्वत:चा उमेदवार उतरविण्यात येईल, असे भारिपचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात पत्रपरिषदेच्या माध्यमातून त्यांनी पक्षाची भूमिका मांडली.

ठळक मुद्देकेवळ नाना पटोले असतील तर समर्थनभंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार उतरविण्याची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील भारिप-बहुजन महासंघाने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारास पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. केवळ नाना पटोले उमेदवार असतील तरच समर्थन देण्यात येईल, अन्यथा पक्षाकडून स्वत:चा उमेदवार उतरविण्यात येईल, असे भारिपचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात पत्रपरिषदेच्या माध्यमातून त्यांनी पक्षाची भूमिका मांडली. भारिपच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीसमोर निवडणुकीमध्ये आव्हान वाढण्याची शक्यता आहे.भाजपाच्या हुकू मशाहीला आणि चुकीच्या धोरणाला कंटाळून नाना पटोले यांनी पक्षाचा राजीनामा दिला व काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१४ च्या निवडणुकीत पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. त्यामुळे खऱ्या अर्थाने या जागेची उमेदवारी नाना पटोले यांनाच मिळणे अपेक्षित होते. मात्र काँग्रेसने पटोले यांचा हक्क डावलून ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडली आहे. हा पटोले यांच्यावर अन्याय असल्याचा आरोप सोनोने यांनी यावेळी केला. पटोले हे भारिप बहुजन महासंघाच्या विचाराचे आहेत, त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली तरच पक्षातर्फे त्यांना समर्थन देण्यात येईल. इतर कुठल्याही उमेदवाराला समर्थन देण्यात येणार नाही, असे सोनोने यांनी सांगितले. पत्रपरिषदेत महासंघाचे प्रदेश महासचिव अमित भुईगळ, कुशल मेश्राम, युसूफ पुंजानी, हरिभाऊ भदे, राजू लोखंडे, गुणवंत देवपारे, रमेश पाटील, पुरुषोत्तम डाकफोडे, दामोधर साव आदी उपस्थित होते.पटोलेंनी अपक्ष लढावेनाना पटोले यांची उमेदवारी डावलल्यामुळे त्यांचे समर्थक नाराज आहेत. पटोले यांनी भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी, जर असे करण्यास अडचण असेल तर अपक्ष शर्यतीत उतरावे. त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असे अशोक सोनोने यांनी सांगितले.प्रकाश आंबेडकरांनी लढवावी पोटनिवडणूक : लोखंडेएकीकडे भारिप बहुजन महासंघातर्फे नाना पटोले यांना समर्थन देण्याची भूमिका जाहीर करण्यात आली असताना ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ.भाऊ लोखंडे यांनी मात्र अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढवावी, असे आग्रही प्रतिपादन केले आहे. १९५४ च्या निवडणुकीत काँग्रेसने षडयंत्र रचून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव केला होता. हा काँग्रेसवर लागलेला कलंक आहे. हा डाग धुवायचा असेल तर त्यांनी प्रकाश आंबेडकर किंवा त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला जाहीर समर्थन करावे. काँग्रेसने पाप केले असा आरोप करणाऱ्या भाजपालाही ही चांगली संधी आहे. भाजपाने रिपब्लिकन उमेदवाराचे समर्थन करून काँग्रेसला धडा शिकवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

 

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूक