शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव दुचाकी टिप्परवर धडकली, तीन युवकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली माेटारसायकल राेडलगत उभ्या असलेल्या टिप्परवर धडकली. त्यात गंभीर दुखापत ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापा : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली माेटारसायकल राेडलगत उभ्या असलेल्या टिप्परवर धडकली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीवरील तिघांचाही मृत्यू झाला. ही घटना खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील काेदेगाव शिवारात मंगळवारी (दि. १६ मार्च) मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली.

राहुल भीमराव शेंडे (२१), आयुष संजय चनकापुरे (१८) व आदित्य अंबादास गजभिये (१८, तिघेही रा. जोगा आग्रा, ता. नरखेड) अशी मृतांची नावे आहेत. तिघेही मित्र असून, ते एमएच ३१ - डीएक्स १३०१ क्रमांकाच्या माेटारसायकलने खाप्याहून सावनेरला ट्रीपल सीट जात हाेते. राहुल माेटारसायकल चालवित हाेता तर अन्य दाेघे मागे बसले हाेते. दरम्यान, काेदेगाव शिवारात त्यांची माेटारसायकल राेडलगत उभ्या असलेल्या एमएच ४० - बीएल ९९६९ क्रमांकाच्या उभ्या टिप्परवर मागून धडकली.

यात तिघांनाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले आणि पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खापा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. टिप्परचालकाने सुरक्षेच्या दृष्टीने काेणत्याही उपाययाेजना केल्या नसल्याचेही चाैकशीदरम्यान आढळून आले. या प्रकरणी आकाश मोहन बांबोडे (२२, रा. आग्रा, ता. नरखेड) यांच्या तक्रारीवरून खापा पाेलिसांनी टिप्परचालक सीताराम श्रीराम निहारे (४२, रा. मनसर, ता. रामटेक) यांच्या विराेधात भादंवि २८३, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक गणेश झांबरे करीत आहेत.