शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील भरतवनचा प्रस्तावित ५०० मीटर रस्ता रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 00:03 IST

मेट्रो रेल्वेच्या प्रस्तावित टर्नलमुळे फुटाळा तलावासमोरील रस्ता बंद क रून भरतवनमधून ५०० मीटरचा नवीन रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार केला जाणार होता. अखेर भरतवनचा हा प्रस्तावित रस्ता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देनागरिकांच्या आंदोलनाला यश : संयुक्त बैठकीत घेतला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रो रेल्वेच्या प्रस्तावित टर्नलमुळे फुटाळा तलावासमोरील रस्ता बंद क रून भरतवनमधून ५०० मीटरचा नवीन रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार केला जाणार होता. भरतनगर ते अमरावती मार्ग या दरम्यानच्या या प्रस्तावित डीपी रोडमुळे भरतवन येथील ५६८ झाडांची कत्तल केली जाणार होती. यामुळे विविध प्रजातीचे पशु-पक्षी व वनसंपदेला नुकसान होण्याची शक्यता होती. यामुळे या रस्ताच्या कामाला स्थानिक नागरिक व स्वयंसेवी संस्थांनी विरोध दर्शविला होता. यासाठी आंदोलन पुकारले होते. अखेर भरतवनचा हा प्रस्तावित रस्ता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.स्थानिक नागरिकांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवीत ‘लोकमत’ने यासंदर्भात वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले होते. नागरिकांचा होणारा विरोध विचारात घेता महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका यांच्या संयुक्त बैठकीत संबंधित प्रस्तावित रस्ता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थानिक नागरिकांनी प्रस्तावित रस्ता रद्द करण्यात यावा, यासाठी महापौर संदीप जोशी यांना आवाहन केले होते. त्यानुसार जोशी यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रस्तावित रस्ता रद्द करण्याची मागणी केली होती. मेट्रो रेल्वेचे टर्नल फुटाळा तलावाजवळ न बनविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यामुळे फुटाळा तलावासमोरील रस्ता बंद होणार नाही. प्रेक्षक गॅलरी निर्माण करण्यात कोणत्याही प्रकारची अडचण नसल्याचे जोशी यांनी निदर्शनास आणले. याला गडकरी यांनी सहमती दर्शविली. त्यामुळे अखेर भरतवनमधून जाणारा रस्ता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.प्रस्तावित रस्त्यामुळे वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार होते. वनसंपदेने समृद्ध असलेल्या भरतवनावर संकट आले होते. परंतु रस्ता रद्द झाल्याने संकट टळले आहे. नागरिकांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाforestजंगल