शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-संघाचा गांधी जयंतीचा निव्वळ फार्स; अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 10:08 IST

भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वच्छता अभियानाच्या नावाखाली महात्मा गांधी यांचे नाव घेत असले तरी, त्यांचा गांधीजींच्या विचारांशी कोणताही संबंध नाही.

ठळक मुद्देसेवाग्राम येथे काँग्रेसची ऐतिहासिक बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वच्छता अभियानाच्या नावाखाली महात्मा गांधी यांचे नाव घेत असले तरी, त्यांचा गांधीजींच्या विचारांशी कोणताही संबंध नाही. आधी त्यांनी स्वत:च्या मनाची स्वच्छता करावी. ते गांधीजींच्या विचारांशी एकसंघ होऊ च शकत नाहीत. भाजपा-संघाचा गांधी जयंतीचा निव्वळ फार्स असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी केला.महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून सेवाग्राम येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची बैठक व पदयात्राचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर देवडिया काँग्रेस भवन येथे आयोजित आढावा बैठकीनंतर अशोक चव्हाण पत्रकारांशी बोलत होते.महात्मा गांधी यांची सर्वधर्मसमभावाची भूमिका भाजपा स्वीकारणार आहे का, असा सवाल करून भाजपा मतासाठी औपचारिकता म्हणून गांधीजींचे नाव घेत असल्याचा हल्लाबोल अशोक चव्हाण यांनी केला. मात्र काँग्रेस हा महात्मा गांधी यांचे विचार व संविधानावर चालणारा पक्ष आहे. काँगे्रसचा कार्यकर्ता त्यांच्या विचाराशी समरस झालेला आहे.गांधीजी यांचे देशासाठी मोठे योगदान आहे. १५० वी गांधी जयंती हा ऐतिहासिक दिवस आहे. यानिमित्ताने वर्षभर संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सेवाग्राम येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची ऐतिहासिक बैठक होत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह पक्षाचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिलीविदर्भ काँगे्रसच्या पाठीशीविदर्भाने काँग्रेसला नेहमीच साथ दिली आहे. काँग्रेसची सत्ता स्थापण्यात मोठे योगदान राहिलेले आहे. याहीवेळी विदर्भाची साथ काँग्रेसला मिळण्याची अपेक्षा आहे. पक्षपातळीवर जोमाने काम करण्याची गरज आहे. नुक त्याच पार पडलेल्या नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले. ग्रामीण भागात बदलाचे वारे वाहू लागले आहे. यातून काँग्रेसला बळ मिळणार असल्याचा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

सेवाग्राम येथील कार्यक्रमाची जय्यत तयारीमहात्मा गांधी यांच्या जयंतीला सेवाग्राम येथे आयोजित काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक व पदयात्रेच्या कार्यक्रमाची पक्षातर्फे जय्यत तयारी सुरू आहे. ही ऐतिहासिक बैठक व पदयात्रा असल्याने तालुका व जिल्हा स्तरावर कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहे. यात विदर्भासह राज्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणMahatma Gandhiमहात्मा गांधी