शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा अग्निकांड : विदर्भातील बड्या नेत्याकडून दोषींना वाचविण्याचा प्रयत्न?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 01:26 IST

Bhandara fire tragedy भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये (एसएनसीयू) १० चिमुकल्यांचा अत्यंत वेदनादायी मृत्यू झाल्यानंतरच कर्तव्यावर असलेले डॉक्टर, परिचारिका, अटेन्डंट, सुरक्षा रक्षक जागे झाले. हे स्पष्ट दिसून येत असतानाही कोणावरच अद्याप कारवाई झाली नाही.

ठळक मुद्देसंबंधितांची नावे उघड न करण्याचा दबाव, ६० तास उलटूनही कोणावरच कारवाई नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये (एसएनसीयू) १० चिमुकल्यांचा अत्यंत वेदनादायी मृत्यू झाल्यानंतरच कर्तव्यावर असलेले डॉक्टर, परिचारिका, अटेन्डंट, सुरक्षा रक्षक जागे झाले. हे स्पष्ट दिसून येत असतानाही कोणावरच अद्याप कारवाई झाली नाही. धक्कादायक म्हणजे, घटनेच्या दिवशी ‘एसएनसीयू’मध्ये कर्तव्यावर असलेल्यांची नावेही सांगण्यास अधिकारी तयार नाहीत. हे विदर्भातील एका बड्या नेत्याचा दबावामुळे होत असल्याचा आणि आता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे. रुग्णालयातील ‘एसएनसीयू’ हा ‘इन बॉर्न युनिट’ व ‘आऊट बॉर्न युनिट’मध्ये विभागला आहे. ‘इन बॉर्न युनिट’मध्ये रुग्णालयात प्रसूती झालेल्या कमी वजनाची व इतरही आजारांची बालके ठेवली जातात, तर ‘आऊट बॉर्न युनिट’मध्ये रुग्णालयाबाहेर प्रसूती झालेली बालके ठेवली जातात. या दोन्ही युनिटमध्ये काचेची भिंत आहे. नियमानुसार या दोन्ही कक्षांत २४ तास डॉक्टर, परिचारिका, अटेंडंट व बाहेर सुरक्षा रक्षक असावे लागतात. कक्षात सोय नसेल, तर बाजूच्या काचेच्या कक्षातून नजर ठेवावी लागते.

प्राप्त माहितीनुसार, घटनेच्या रात्री तिथे डॉक्टर उपस्थित नव्हते. दोन परिचारिका व एक अटेंडंट होता. परिचारिका रात्री १० च्या सुमारास ‘एसएनसीयू’ला बाहेरून बंद करून झोपण्यासाठी बाजूच्या कक्षात निघून गेली. ‘आऊट बॉर्न युनिट’ला आगीला सुरुवात होण्यापासून ते तीन बालकांचा जळून, तर सात बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू होईपर्यंत कोणाचेच लक्ष गेले नाही. जेव्हा धूर ‘एसएनसीयू’मधून बाहेर येऊ लागला तेव्हा कुठे प्रशासन जागे झाले. यावरून कर्तव्यावर असलेल्यांचा कसूर स्पष्ट दिसून येतो. भंडारा अग्निकांड दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. यातील दोषींवर कडक कारवाई केली जाणार, कुणालाच मुलाहिजा ठेवणार नसल्याचे शासन म्हणत असले तरी घटना होऊन ६० तास उलटून गेले आहेत. मागील दोन दिवसांपासून चौकशी समितीचे सदस्य भंडाऱ्यात तळ ठोकून आहेत. परंतु, दोषींना अद्यापही सामोर केलेले नाही. यासाठी एक नेता आपल्या अधिकारांचा गैरवापर करीत असल्याचेही बोलले जात आहे.

टॅग्स :Bhandara Fireभंडारा आग