शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

मालगुजार तलावांना नवसंजीवनी देणारे भगीरथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 11:23 IST

राज्याच्या पाटबंधारे विभागात अधीक्षक अभियंता शिरीष आपटे यांनी प्रशासकीय अनास्थेमुळे मरणप्राय झालेल्या मालगुजार तलावांना नवसंजीवनी देण्याचा त्यांनी संकल्प हाती घेतला व प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून त्यांनी अनेक तलावांना नवे रुप दिले.

ठळक मुद्दे पारंपरिक जलसाठ्यांना पुनरुज्जीवन देण्यासाठी पुढाकार शिरीष आपटे यांनी प्रस्थापित केला आदर्श

योगेश पांडे।आॅनलाईन लोकमतनागपूर : साधारणत: सरकारी नोकरीत अधिकारीपदावर असलेली व्यक्ती ‘आपण भले आणि आपले काम भले’ या विचारातूनच काम करताना दिसून येते. मात्र समाजाला आपणदेखील काही तरी देणे लागतो या विचारातून काही अधिकारी झटत असतात. स्वत:च्या कार्यकक्षेत काम करताना ते समाजहिताचा आदर्शदेखील प्रस्थापित करतात. राज्याच्या पाटबंधारे विभागात अधीक्षक अभियंता शिरीष आपटे यांनी अशीच प्रेरणा निर्माण केली आहे. प्रशासकीय अनास्थेमुळे मरणप्राय झालेल्या मालगुजार तलावांना नवसंजीवनी देण्याचा त्यांनी संकल्प हाती घेतला व प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून त्यांनी अनेक तलावांना नवे रुप दिले. त्यांच्या भगीरथ प्रयत्नांमुळे प्रशासन व समाजातदेखील जागृती निर्माण झाली आहे हे विशेष.भोसले व गोंडशासनकाळात निर्माण करण्यात आलेले व ऐतिहासिक परंपरा लाभलेले मालगुजारी तलाव पूर्व विदर्भातील शेतकऱ्यासाठी एकेकाळी ‘लाईफलाईन’ होते. मात्र प्रशासकीय अनास्थेमुळे या तलावांकडे काहीसे दुर्लक्ष झाले होते. अनेक तलावांमध्ये तर गाळदेखील साचला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात पाणी मिळत नव्हते. २००८ साली शिरीष आपटे यांची भंडारा येथे लघु पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता म्हणून बदली झाली. मूळचे भंडारा येथीलच असलेले आपटे यांनी ही बदली एक आव्हान व संधी म्हणून स्वीकारली.मालगुजार तलावांची स्थिती आणि त्यांची क्षमता जाणून असलेल्या आपटे यांनी २८ तलावांचा अभ्यास केला. यातील २२ तलावांत मोठ्या प्रमाणात गाळ साठला होता. विभागातील दुसºया प्रकल्पात गाळ काढण्यासाठी उपकरणे उपलब्ध होती. केवळ डिझेलचा खर्च लागणार होता. आपटे यांनी आवश्यक त्या प्रशासकीय परवानगी घेतल्या व एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. पहिल्या वर्षी पाच तलावांपासून सुरुवात झाली होती. या सर्व तलावांमधील साठ्यात सुमारे २ मीटरने वाढ झाली. तसेच भूजल पातळीदेखील वाढली. शिवाय शेतकऱ्यांना  बारमाही पाणी उपलब्ध झाले. आपटे यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीदेखील त्यांना सन्मानित केले आहे.शासनाला मिळाली दिशाआपटे यांच्या या पुढाकारामुळे शेतकऱ्यांचा  मोठा फायदा झाला. परिसरातील भूजल पातळी वाढली. वर्षभर पीक घेण्याचा पर्याय उपलब्ध झाला. शेतकºयांची आर्थिक स्थिती चांगली झाली. काही गावात ६ ट्रॅक्टर होते, तेथे ही संख्या ६५ वर पोहोचली. विशेष म्हणजे शासनानेदेखील हा उपक्रम गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली येथे राबविला. जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद व स्थानिक प्रशासनाच्या अखत्यारित असलेल्या तलावांनादेखील या माध्यमातून नवसंजीवनी देण्यास सुरुवात झाली. शासनातर्फे तर आता यासाठी विशेष अनुदानदेखील देण्यात येत आहे. अगदी खासगी कंपन्यांनीदेखील कोट्यवधींच्या मदतीचा हात दिला.पारंपरिक सिंचन ‘गेमचेंजर’ ठरू शकतेआम्ही काम केलेल्या ३३ गावांमध्ये शिक्षणाचे चांगले पर्याय उपलब्ध झाले. शेतकºयांचे जीवनमान उंचावले. इतकेच काय तर गावाबाहेर पाणी उपलब्ध झाल्यामुळे जंगली श्वापदे मानवी वस्तीत शिरण्याचा धोकादेखील कमी झाला. या गोष्टींचा तर आम्हीदेखील विचार केला नव्हता. आपल्या देशात विविध भागांमध्ये पारंपरिक सिंचन प्रणाली उपलब्ध आहेत. माथा ते पायथा पद्धतीने पूर्व विदर्भात हजारो मालगुजार तलाव आहेत. या तलावांना नवसंजीवनी मिळाल्यास केवळ जलपातळीच वाढणार नाही, तर शेतकºयांची विविध दृष्टीने प्रगतीदेखील होऊ शकते. यासाठी शासन, समाज आणि विविध कॉर्पोरेट कंपन्यांनी एकत्रित पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असे मत शिरीष आपटे यांनी व्यक्त केले.