शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरचे  अतिरिक्त आयुक्त भरणे यांना फॉरेन्सिक सायकोलॉजीत पीएचडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 00:23 IST

येथील अतिरिक्त पोलीस आयुक्त नीलेश भरणे यांना रक्षा शक्ती युनिव्हर्सिटी अहमदाबाद (गुजरात) ने फॉरेन्सिक सायकोलॉजीत पीएचडी प्रदान केली.

ठळक मुद्देदेशातील एकमेव नॅशनल पोलीस युनिव्हर्सिटी : पहिले आयपीएस ठरले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येथील अतिरिक्त पोलीस आयुक्त नीलेश भरणे यांना रक्षा शक्ती युनिव्हर्सिटी अहमदाबाद (गुजरात) ने फॉरेन्सिक सायकोलॉजीत पीएचडी प्रदान केली. अहमदाबादमध्ये सोमवारी हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. रक्षा शक्ती युनिव्हर्सिटी ही देशातील एकमेव इंटर्नल सिक्युरिटी व नॅशनल पोलीस युनिव्हर्सिटी आहे.हायप्रोफाईल केसेस, आर्थिक गुन्हे, व्हाईट कॉलर क्रिमिनलशी संबंधित संवेदनशील गुन्ह्यांचा तपास करताना फॉरेन्सिक सायकोलॉजीचा पुरेपूर फायदा होतो. क्लिष्ट गुन्ह्याचा गुंता सोडविण्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या ब्रेन मॅपिंग, पॉलीग्राफी, नार्को टेस्ट या सारखी टेक्निक्स याच युनिव्हर्सिटीने विकसित केल्या आहेत. ५ मे २०१० च्या श्रीमती सेल्फी वर्सेस स्टेट आॅफ कर्नाटका या जजमेंट नंतर पॉलीग्राफी करण्यास कोर्टा समक्ष परवानगी घ्यावी लागते. एक्सपर्ट इव्हिडन्स म्हणून फॉरेन्सिक एक्सपर्टचे मत कोर्टात ग्राह्य धरले जाते. फॉरेन्सिक सायकोलॉजी या विषयात पीएचडी केल्यामुळे तपासात भरणे यांनाच नव्हे तर पोलीस दलालाही त्याचा फायदा होणार आहे.देशातच नव्हे तर विदेशातही गुजरात फॉरेन्सिक युनिव्हर्सिटीचे नाव आहे. येथून पीएचडी मिळविण्यासाठी भरणे यांना पाच वर्षाचा कार्यकाळ लागला. त्यांनी डेहराडून, लखनौसह ठिकठिकाणच्या १०० गुन्ह्यांचा अभ्यास आपल्या शोधप्रबंधात जोडला. गुजरात फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीचे (जीएफएसयू) डॉ. मुकुंदन यांनी ब्रेन मॅपिंग टेक्निक ला अधिक विकसित केले. डॉ. मुकुंदन यांच्या गाईड डॉ. एस. एल. वाया होत्या. डॉ. वाया जीएफएसयूच्या संचालक आहेत. नीलेश भरणे यांनाही फॉरेन्सिक सायकोलॉजीत पीएचडी मिळविण्यासाठी डॉ. वाया मार्गदर्शक (गाईड) म्हणून लाभल्या. तर, सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लेबॉरिटीज (सीबीआय) नवी दिल्लीच्या संचालक डॉ. आशा श्रीवास्तव यांनी को-गाईड म्हणून भरणे यांना मार्गदर्शन केले. फॉरेन्सिक सायकोलॉजी या विषयात पीएचडी करणारे देशात ते एकमेव आयपीएस अधिकारी आहेत. शनिवारी भरणे यांना रक्षा शक्ती युनिव्हर्सिटीकडून ही गोड बातमी मिळाली. त्यानंतर सोमवारी सकाळी भरणे अहमदाबादला पोहचले. तेथे प्रमाणपत्र आणि बुके देऊन डॉ. वाया यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी युनिव्हर्सिटीचे रजिस्टार डॉ. धर्मेश प्रजापती हजर होते. मंगळवारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनीही पोलीस आयुक्तालयात त्यांना बुके देऊन त्यांचे अभिनंदन केले.

टॅग्स :police commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालय