शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन फसवणुकीपासून सावध राहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 23:06 IST

आॅनलाईन फसवणुकीच्या घटना अलीकडे वाढत आहे. त्यातच बँकेतून अधिकारी बोलतो, एटीएमची मुदत संपली, तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी (वन टाईम पासवर्ड) पाठवा अशा भूलथापा देत लुबाडणुकीचे प्रकार वाढले आहेत. याकडे लक्ष वेधत अशा फसवणुकींपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे. सोबतच ‘सोशल मीडिया’वर अकाऊंट हाताळतानाही काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

ठळक मुद्देनागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे आवाहन : ‘सोशल मीडिया’द्वारेही होऊ शकतो घात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आॅनलाईन फसवणुकीच्या घटना अलीकडे वाढत आहे. त्यातच बँकेतून अधिकारी बोलतो, एटीएमची मुदत संपली, तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी (वन टाईम पासवर्ड) पाठवा अशा भूलथापा देत लुबाडणुकीचे प्रकार वाढले आहेत. याकडे लक्ष वेधत अशा फसवणुकींपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे. सोबतच ‘सोशल मीडिया’वर अकाऊंट हाताळतानाही काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.गेल्या काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी फसवणुकीच्या घटना समोर आल्या. एटीएम बदलवून फसवणूक करणे, आॅनलाईन व्यवहारात फसवणूक, बँकेचा अधिकारी असल्याची बतावणी करीत तुमच्या बँक अकाऊंटमधून पैसे वळते करणे असे प्रकार घडलेले आहेत. यासाठी नागरिकांनीच सतर्क राहणे गरजेचे आहे. सोबतच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी फ्लेक्स, बॅनर, पत्रके वाटण्यासोबतच नागपूर ग्रामीण पोलीस दलातर्फे चर्चासत्र घेण्यात येत आहे.एटीएम कार्ड बदलविणे, ओटीपी मागविण्यासोबतच अलीकडे तुम्हाला पाच लाखांचे बक्षीस लागले आहे, अशी नवीन शक्कल चोरट्यांनी लढविली आहेत. यामध्ये वेबसाईटवर वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखविले जाते. त्या आमिषाला बळी पडल्यास फसवणूक होते. हे टाळण्यासाठी ‘एचटीटीपी’ (हायपर टेस्क्ट प्रोटोक्रॉल) ऐवजी ‘एटीटीपीएस’ (हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल) पासून तयार होणाऱ्या वेबसाईटला प्राधान्य द्यावे. त्या वेबसाईट या सुरक्षित असतात, असे पोलिसांनी म्हटले आहे. आॅनलाईन फसवणूक झाल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याला सूचना द्यावी. सर्वच पोलीस ठाण्याला तशा सूचना देण्यात आल्या असून फसवणूक झाल्यास संबंधिताकडून कोणती माहिती घ्यायची याबाबतचा नमुना अर्ज पाठविला आहे. जेवढ्या लवकर ही प्रक्रिया कराल, तेवढे उत्तम असून पैसे परत मिळण्याची खात्री अधिक राहील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.एटीएमद्वारे सुट्यांच्या दिवसांत फसवणूकएटीएमची मुदत संपलेली आहे, त्यावरील क्रमांक पाठवा, आता ओटीपी येईल असे सांगून फसवणूक करण्याच्या घटना या मुख्यत: शनिवार-रविवारी किंवा सलग सुट्या असलेल्या दिवसांमध्ये अधिक होतात. सुटीच्या दिवशी फसवणूक झाली तरी ग्राहक त्याच्याकडून आवश्यक कागदपत्रे बँकेला सुटीच्या दिवशी पोहोचवू शकत नाही. त्यामुळे चोरट्यांचे फावते. याबाबत नागरिकांनी जागरूक राहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी केले आहे.वैयक्तिक माहिती अपलोड करू नका‘सोशल मीडिया’वर विशेषत: फेसबुकवर स्वत:चे फोटो, कुटुंबाचे फोटो आणि इतर वैयक्तिक माहिती अपलोड केली जाते. ती माहिती चोरली जाण्याची अधिक शक्यता असते. त्यातच तुमच्या आणि तुमच्या कुटुंबीयांच्या फोटोचा गैरवापर केला जाऊ शकतो. फेसबुकवर अनेक महिलांचे, तरुणींचे बनावट अकाऊंट तयार करून फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. त्यामुळे ‘सोशल मीडिया’ हाताळताना काळजी घ्या, आक्षेपार्ह संदेश वा अफवा पसरवू नका, असे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.

टॅग्स :onlineऑनलाइनfraudधोकेबाजी