शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सापांशी खेळाल तर खबरदार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 01:23 IST

१९७२ च्या वन्यजीव कायद्याअंतर्गत त्याला मारणे किंवा त्याच्याशी खेळणे हा गुन्हा असून सापांचा खेळ करणाऱ्या गारुड्यांवर कारवाई करण्याचा इशारा वनविभागाने दिला आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : कोणताही साप दिसला की प्रत्येकाचा थरकाप उडणे साहजिक आहे. असे असले तरी या सरपटणाऱ्या प्राण्यांबाबत बऱ्यापैकी जागृती लोकांमध्ये निर्माण झाली असल्याने आता मारण्याऐवजी सर्पमित्रांना बोलावून त्याचे संरक्षण करण्यावर लोकांचा भर असतो. साप हा निसर्गातील अन्नसाखळीचा महत्त्वाचा घटक आहे. १९७२ च्या वन्यजीव कायद्याअंतर्गत त्याला मारणे किंवा त्याच्याशी खेळणे हा गुन्हा असून सापांचा खेळ करणाऱ्या गारुड्यांवर कारवाई करण्याचा इशारा वनविभागाने दिला आहे.पावसाळ्यात खाचखळगे व बिळांमध्ये पाणी शिरल्याने साप बाहेर पडतात. शिवाय त्यांना आवश्यक असलेले भक्ष्य मानवी वस्तीत असल्याने ते मानवी वस्तीत प्रवेश करतात. मानवी वस्तीत साप दिसला की नागरिक थेट सर्पमित्रांना बोलवितात. पकडलेले साप स्वत: जवळ न ठेवता ते वनविभागाच्या स्वाधीन करने गरजेचे आहे. परंतु प्रत्यक्षात तसे घडतच नाही. काही प्रामाणिक सर्पमित्र वनविभागाच्या स्वाधीन करतातही पण काही या सापांचे हाल करतात. त्याच्यासोबत खेळत असलेले व्हिडिओ व्हायरल करतात. स्वत:च्या स्टंटबाजीसाठी सर्पमित्र पकडलेले साप स्वत:जवळच ठेवतात. तर काही वेळा हे पकडलेले साप विषारी की बिनविषारी हे पाहून त्याची तस्करी देखील केली जाते. हा कायद्याने गुन्हा आहे. सापाचे हाल करणाऱ्या, त्यांच्याशी खेळणाºया अशा गारुड्यांवर कारवाई करण्याबाबत वनविभाग सज्ज असून अशांची माहिती देण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.काही वर्षांपूर्वी सापांचा खेळ करणाऱ्या गारुड्यांऐवजी सर्पमित्राच्या रूपात नवे गारुडी आज मोठ्या प्रमाणात गल्लोगल्ली दिसू लागले आहेत. त्यांच्यावर बंदी घालण्याच्या दृष्टीने वनविभाग प्रयत्न करीत आहे. एवढेच नाही तर नागपंचमीच्या दिवसांत गावोगावी वनविभागाचे कर्मचारी गस्त घालणार आहेत. तसेच गाव-शहरातील मंदिर परिसरातदेखील वनकर्मचारी सक्रिय राहणार असल्याची माहिती नागपूर वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ला यांनी दिली.दीड हजार सापांना जीवदानसर्पमित्रांनी पकडलेली साप नागपंचमीच्या दिवशी एकत्र करून जंगलात न सोडता ते ट्रान्झिस्ट ट्रीटमेंट केंद्राकडे आणून द्यावे. आत्तापर्यंत या केंद्राच्या माध्यमातून सुमारे १ हजार ५०० साप वाचविण्यात यश आले असल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी दिली. सापांशी खेळ करून त्यांचे हाल करणे हे वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या विरुद्ध आहे. जे असे प्रकार करतात त्यांच्यावर वनविभाग कारवाई करेल, असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :snakeसापforestजंगल