नागपूर : देशात दरवर्षी कर्करोगाचे १७ लाख रुग्ण नव्याने आढळतात. ९ लाख रुग्णांचा मृत्यू होतो. यावरून या आजारापासून बचाव करणे हाच एकमेव उपाय आहे, हे स्पष्ट आहे. पहिल्या टप्प्यातच या आजाराचा इलाज शक्य आहे.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे इलाज शक्य
कर्करोग विशेषज्ञ डॉ. सौरभ प्रसाद म्हणाले, कोरोना काळात या रुग्णांना हाय रिस्कवर ठेवण्यात आले आहे. त्यातील अनेकांची गंभीर होण्याची शक्यता जास्त आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांची किमोथेरपी थांबविली जात होती. परंतु आता यात नवे तंत्रज्ञान आल्याने इलाज शक्य आहे. परंतु विलंबामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. हे लक्षात घेऊन रुग्णांनी आता पहिल्याच टप्प्यात उपचारासाठी पुढे यायला हवे. देशात हृदय आणि मधुमेहानंतर कर्करुग्णांची मृत्युसंख्या अधिक आहे. स्कैल्प कूलिंग तंत्र आल्याने आता किमोनंतर केसही गळत नाहीत.
...
स्क्रीनिंग करा, जागृत राहा
कर्करोग सर्जन विशेषज्ञ डॉ. नितीन बोमनवार म्हणाले, भारतात कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. दरवर्षी १४ लाख रुग्ण आढळतात. ८ ते १० लाख रुग्णांचा मृत्यू होतो. नागपुरात या रुग्णांची संख्या तशी अधिकच आहे. तंबाखू सेवनही याला कारणीभूत आहे. ६० ते ७० टक्के प्रकरणे तिसऱ्या टप्प्यात येतात. ब्रेस्ट कॅन्सरही वेगाने वाढत आहे. जीवनशैलीत बदल, संतुलित आहार, वेळेवर व्हॅक्सिनेशन आणि स्क्रीनिंग यातून बरेच नियंत्रण मिळवता येऊ शकते.
...
रुग्णांना पहिल्या टप्प्यातच उपचारांसाठी आणा
कॅन्सररोग विशेषज्ञ (ईएनटी) डॉ. बी. के. शर्मा म्हणाले, रुग्ण आणि नातेवाइकांची जागरूकता महत्त्वाची आहे. रुग्णाला पहिल्या टप्प्यातच उपचारांसाठी आणायला हवे. राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर रुग्णालयातून यंदा कोरोनामुळे जनजागृती रॅली काढली जाणार नाही. या वर्षी कॅन्सर प्रदर्शनी आयोजित केली जाणार आहे.
...
भारतातील कॅन्सरची स्थिती
भारतात २०२० मध्ये कॅन्सरचे १७ लाख ३० हजार रुग्ण होते. यातील ८ लाख ८ हजारांचा मृत्यू झाला. ब्रेस्ट, यकृत, सर्विक्सच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. फक्त १२.५ टक्के रुग्ण पहिल्या स्टेजमध्ये उपचारांसाठी येतात. एकूण रुग्णांमध्ये १० टक्के अर्थात १५ लाख ब्रेस्ट कॅन्सरचे होते. यकृताचे १.४ लाख, तर सर्व्हायकल कॅन्सरचे १ लाख ४ हजार रुग्ण आढळले. दर आठ मिनिटात सर्व्हायकल कॅन्सरने एका महिलेचा मृत्यू होतो. ब्रेस्ट कॅन्सरने दोन महिला रुग्णात एकाचा मृत्यू होतो. रोज २,५०० रुग्णांचा तंबाखूमुळे मृत्यू होतो.
...