शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी समाज संस्कृतीसोबतच जल, जमीन आणि जंगलांचा रक्षक : मुख्यमंत्री फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 22:03 IST

नागपूर आणि परिसराला गोंड राजाची समृद्ध परंपरा लाभली असून, देशातील जल, जमीन आणि जंगलांचे रक्षण करण्याचे काम आदिवासी समाजाने पूर्वीपासूनच केले आहे. आजही समृध्द संस्कृती, परंपरा जोपासण्याचे काम आदिवासी समाज करीत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ठळक मुद्देफुटाळा तलाव येथे आदिवासी महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर आणि परिसराला गोंड राजाची समृद्ध परंपरा लाभली असून, देशातील जल, जमीन आणि जंगलांचे रक्षण करण्याचे काम आदिवासी समाजाने पूर्वीपासूनच केले आहे. आजही समृध्द संस्कृती, परंपरा जोपासण्याचे काम आदिवासी समाज करीत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.महापालिकेतर्फे फुटाळा तलाव येथे दोन दिवसीय आदिवासी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन यशस्वी आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गजकरी, खा. फग्गनसिंग कुलस्ते, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्या माया इवनाते, आ. सुधाकरराव देशमुख, आ. डॉ. परिणय फुके, ‘नागपूर का राजा’ महानाट्याचे निर्माते अमित कोवे उपस्थित होते.स्व. चिंतामन इवनाते यांनी नागपुरात परंपरागत आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याच्या हेतूने या महोत्सव आयोजनाची संकल्पना मांडली. तसेच त्यांनी आदिवासींना एकत्र करून मोठे आंदोलन उभारले. या भागात आदिवासींची अतिशय समृध्द अशी संस्कृती असून, तितकीच मोठी वेगळी परंपरा जोपासली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.पूर्वीपासूनच आदिवासी समाज हा जंगलाच्या सान्निध्यात राहिल्याने देशातील जल, जंगल आणि जमिनीचा संरक्षक राहिला आहे. हे करत असताना आदिवासींनी आपली वेगळी आणि समृद्ध परंपरा जोपासत संस्कृती जिवंत राहावी, यासाठीही मोठी मेहनत घेतली आहे. आजही आदिवासी संस्कृतीचे वेगवेगळे रंग आहेत, त्यातून वेगवेगळ्या छटा अभिव्यक्त केल्या जात आहेत. राजे बख्त बुलंद शहा यांनी या आदिवासी संस्कृती, समाजाला मोठा आकार, आधार दिला, त्यासोबतच परंपरा आणि स्वतंत्र अस्मिता दिली. या संस्कृती, परंपरेला नागपूरकरांनी लक्षात ठेवले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. यानंतर नागपूर का राजा महानाट्याचे अमित कोवे आणि चमूने सादरीकरण केले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसTrible Development Schemeआदिवासी विकास योजना