शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी फुटल्याने नागपुरातील  बेसा जलमय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 23:33 IST

नागपूर शहरालगतच्या बेसा गावासह ११ गावांना पाणीपुरवठा होणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची जलवाहिनी फुटल्याने मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास बेसा परिसर जलमय झाला होता. बेसा गावात गुडघाभर पाणी साचले होते. यामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली होती.

ठळक मुद्देतीव्र टंचाईच्या काळात लाखो लिटर पाण्याची नासाडीदुकाने, बँक शाखा, एटीएममध्ये पाणी साचलेअनेक गावांना काही दिवस पाणी नाहीपाणी साचल्याने वाहतूक ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरालगतच्या बेसा गावासह ११ गावांना पाणीपुरवठा होणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची जलवाहिनी फुटल्याने मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास बेसा परिसर जलमय झाला होता. बेसा गावात गुडघाभर पाणी साचले होते. यामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली होती.नागपूर जिल्ह्यातील बेसा गावात पाणीटंचाई आहे. पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागते. अशा परिस्थितीत गावात सर्वत्र पाणी वाहत असल्याने या भागात मुसळधार पाऊ स झाल्याने घरात व दुकानात पाणी शिरावे अशी परिस्थिती निर्माण झाली होती.स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार बेसा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मागील काही वर्षापासून रस्त्याचे काम सुरू आहे. मंगळवारी काम सुरू असताना प्राधिकरणाची मुख्य जलवाहिनी फुटली. काही वेळात परिसर जलमय झाला. लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत होते. यामुळे एक तास वाहतूक विस्कळीत झाली होती. जलवाहिनी नजिकच्या कॉम्प्लेक्समधील तळमजल्यावरील दुकानात पाणी साचले. बँक ऑफ इंडियाच्या बेसा येथील शाखा, एटीएम, खासगी कार्यालयात पाणी साचले. जलवाहिनी फुटलेल्या परिसरातील पावसाळी नाल्या तुंबल्याने जलवाहिनीचे पाणी साचले. यामुळे पाणी वाहून जाण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यालगतचा भाग तोडावा लागला.डीपीमुळे पाण्यात वीज प्रवाहजलवाहिनी फुटलेल्या ठिकाणाजवळील कॉम्प्लेक्सच्या बाजूला अलेल्या डीपीत पाणी शिरल्याने पाण्यात वीज प्रवाह आला. याची जाणीव होताच विद्युत विभागाला सूचना देण्यात आली. थोड्याच वेळात वीज पुरवठा बंद करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.११ गावात जलसंकटप्राधिकरणच्या पाणीपुरवठा योजनेतून बेसासह पसिरातील ११ गावांना पाणीपुरवठा होतो. यात बेसा, बेलतरोडी, घोगली, पिपला,बहादूरा, हुड़केश्वर खुर्द, गोमती-कामठी व अन्य गावांचा समावेश आहे. मंगळवारी जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले. यामुळे या गावांचा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदारांनी जलवाहिनीचा विचार न करता खोदकाम केल्याने ही घटना घडल्याचे नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी