शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराची दगाबाजी : शरीरसंबंध एकीशी लग्न दुसरीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 21:04 IST

लग्नाच्या आणाभाका घेत तीन वर्षांपासून ३३ वर्षीय तरुणीसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या प्रियकराने दुसरीशी लग्न करण्याची तयारी चालविल्याचे लक्षात आल्यामुळे प्रेयसीने पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी धोकेबाजी करणाऱ्या प्रियकराविरुद्ध बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देप्रेयसीने लावला बलात्काराचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लग्नाच्या आणाभाका घेत तीन वर्षांपासून ३३ वर्षीय तरुणीसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या प्रियकराने दुसरीशी लग्न करण्याची तयारी चालविल्याचे लक्षात आल्यामुळे प्रेयसीने पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी धोकेबाजी करणाऱ्या प्रियकराविरुद्ध बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.गौरव रवी वानखेडे (वय २९) असे आरोपीचे नाव आहे. तो श्रीगणेश रेसिडेन्सी, पंचतारा सोसायटी, मनीषनगर येथे राहतो.गौरव एका खासगी विमा कंपनीत काम करतो. अंबाझरीतील ३३ वर्षीय तरुणीसोबत त्याचे पाच वर्षांपूर्वी ओळख झाली. ती ब्युटी पार्लरमध्ये काम करते. ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. त्या दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या. १३ जानेवारी २०१६ ला एका कार्यक्रमानंतर त्यांनी शरीरसंबंध प्रस्थापित केले, नंतर ते वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित करू लागले. घरची मंडळी बाहेर गेली की तो तिला आपल्या घरी न्यायचा, तर कधी दुसरीकडे नेऊन शरीरसंबंध जोडायचा. तीन वर्षांत त्यांनी पती-पत्नीसारखा एकमेकांवर हक्क दाखवला. दरम्यान, १६ जुलैला असेच ते सोबत असताना गौरवच्या मोबाईलमध्ये तिला त्याच्या साक्षगंधाचे फोटो दिसले. ते पाहून ती हादरली. तिने त्याला जाब विचारला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तो दुसऱ्याच तरुणीसोबत लग्नाच्या तयारीत असल्याचे लक्षात आल्याने तरुणीने त्याला धमकावले. दोन दिवसांत लग्न करण्याचा हट्ट धरला.तो ‘आऊट ऑफ रेंज’लग्नाला होकार देऊन १० दिवसांपासून टाळाटाळ करणारा गौरव नागपुरातून पळून गेला. तो ‘आऊट ऑफ रेंज’ असल्याचे ध्यानात आल्याने तरुणीने बेलतरोडी पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गौरव वानखेडेविरुद्ध बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक मनपिया प्रकरणाचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार