शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अशी आहे घंटी कोड सिस्टीम : चार घंट्या वाजताच एसटी पोहोचते ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:31 IST

बसने प्रवासाला निघाल्यावर प्रत्येकाला कंडक्टर वाजवितो त्या घंटीचा आवाज ऐकू येतो. वाहकाने वाजविलेल्या घंटीतील कोडच्या आधारावर चालक आपल्याला पुढे जायचे की काय याचा निर्णय घेतो. बसमध्ये असामाजिक तत्त्व वाद घालत असतील तर वाहक चालकाला काहीच न बोलता घंटीने इशारा करतो. घंटी ऐकल्यानंतर चालकही कोणताच प्रश्न न करता जवळच्या पोलीस ठाण्यात बस नेतो. एसटी महामंडळातील ही घंटी कोड सिस्टिम चालक-वाहकातील समन्वयासाठी महत्त्वाचा दुवा ठरत आहे.

ठळक मुद्देसलग शॉर्ट हॉर्न वाजल्यास मिळते रेल्वे अपघाताची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बसने प्रवासाला निघाल्यावर प्रत्येकाला कंडक्टर वाजवितो त्या घंटीचा आवाज ऐकू येतो. वाहकाने वाजविलेल्या घंटीतील कोडच्या आधारावर चालक आपल्याला पुढे जायचे की काय याचा निर्णय घेतो. बसमध्ये असामाजिक तत्त्व वाद घालत असतील तर वाहक चालकाला काहीच न बोलता घंटीने इशारा करतो. घंटी ऐकल्यानंतर चालकही कोणताच प्रश्न न करता जवळच्या पोलीस ठाण्यात बस नेतो. एसटी महामंडळातील ही घंटी कोड सिस्टिम चालक-वाहकातील समन्वयासाठी महत्त्वाचा दुवा ठरत आहे.बसमध्ये बसल्यानंतर वाहकाने एकदा घंटी वाजविल्यास ती ऐकून चालक गाडी थांबवितो. दोन वेळा घंटी वाजविल्यास बस पुढे नेण्याची सूचना करण्यात येते. तीन वेळा वाजविल्यास मागून येणाऱ्या वाहनाला समोर जाण्यासाठी जागा द्यावी आणि चार वेळा घंटी वाजविल्यास बस पोलीस ठाण्यात नेण्याची, पाच वेळा घंटी वाजविल्यास बस रुग्णालयात नेण्याची सूचना करण्यात येते. ही घंटी कोड सिस्टीम एसटी महामंडळ सुरूझाल्यापासून सुरूअसून या सर्व बाबी चालक-वाहकांना प्रशिक्षण घेताना शिकविल्या जातात. त्याबाबत त्यांना अनुभव देण्यात येतो. एसटी महामंडळाने विकसित केलेली ही घंटी कोड सिस्टीम प्रवासात समन्वय साधण्यासाठी महत्त्वाची आहे.रेल्वेतही हॉर्न कोडने साधतात समन्वयरेल्वेने प्रवास करत असाल आणि लोकोपायलटने सलग लहान आवाजातील हॉर्न वाजविणे सुरू केले तर अपघात झाल्याची किंवा रेल्वे रुळावरून घसरल्याची सूचना समजावी. रेल्वेतही हॉर्न कोड असून लोकोपायलट कसा हॉर्न वाजवितो त्यावर समोरील परिस्थितीची माहिती गाडीचा गार्ड, टीसी आणि गाडीतील आरपीएफ जवानांना मिळते. लोकोपायलटने दोन लहान हॉर्न आणि एक लांब हॉर्न वाजविल्यास गाडीत चेन पुलींग झाली असल्याची सूचना देण्यात येते. रेल्वेगाडीला पुढे जाण्यासाठी सिग्नल मिळत नसल्यास लाँग हॉर्न, गेट क्रॉस करताना कुणी समोर येऊ नये यासाठी लाँग हॉर्न वाजविण्यात येतो. रेल्वेगाडी स्टेशनवरून सुटताना एक लहान हॉर्न आणि एक मोठा हॉर्न, सिग्नल खराब झाले आणि रेड सिग्नल सुरू असताना गाडी पुढे नेण्याची सूचना मिळाल्यास लहान हॉर्न, मोठा हॉर्न आणि लहान हॉर्न वाजविण्यात येतो. रेल्वेगाडी दोन रेल्वेस्थानकादरम्यान सेक्शनमध्ये उभी झाल्यास चार वेळा शॉर्ट हॉर्न वाजविण्यात येतो. या हॉर्नच्या आवाजावरून गाडीतील टीसी, गार्ड आणि आरपीएफ जवानांना संबंधित बाबीची कल्पना येते. त्यानुसार ते आपले कर्तव्य बजावतात.

 

टॅग्स :Public Transportसार्वजनिक वाहतूकPolice Stationपोलीस ठाणे