शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

‘एम्स’च्या ओपीडीला सुरुवात : रोज ४० ते ६० रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 01:16 IST

बहुप्रतीक्षेत असलेल्या व राज्य शासनाचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेला (एम्स) आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. सोमवारपासून बाह्यरुग्ण विभागही (ओपीडी) रुग्णसेवेत आले आहे.

ठळक मुद्दे मिहानमध्येच द्वितीय वर्षातील एमबीबीएसचे वर्गही सुरू

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : बहुप्रतीक्षेत असलेल्या व राज्य शासनाचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेला (एम्स) आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. मिहान येथील २०० एकरमध्ये एमबीबीएसच्या १५० विद्यार्थ्यांचे वर्ग व वसतिगृह सुरू झाले असून, सोमवारपासून बाह्यरुग्ण विभागही (ओपीडी) रुग्णसेवेत आले आहे. विशेषत: ‘ओपीडी’ला सुरुवात होत नाही तोच रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे.

नागपूरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मिहान येथे ‘एम्स’च्या इमारतींचे बांधकाम अद्यापही सुरू आहे. परंतु वर्गखोल्या, मुला-मुलींचे वसतिगृह, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था व ‘ओपीडी’च्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यामुळे मेडिकलमध्ये गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या ५० विद्यार्थ्यांच्या एमबीबीएसचे वर्ग आता मिहानमध्ये सुरू झाले आहे. त्यांच्या निवासाची सोयही मिहानमधील वसतिगृहात करण्यात आली आहे. यावर्षी ‘एम्स’ने एमबीबीएसच्या १०० जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे. यातील एका विद्यार्थ्याने ऐनवेळी दुसºया ठिकाणी प्रवेश घेतल्याने एक जागा अद्यापही रिक्त आहे. त्यांचेही वर्ग आता नियमित झाले आहेत.ओपीडीत औषधांपासून ते चाचण्यांची सोय‘एम्स’च्या संचालक, मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ९ सप्टेंबरपासून मिहान येथे बाह्यरुग्ण विभागाला सुरुवात करण्यात आली आहे. रोज साधारण ४० ते ६० च्या दरम्यान रुग्ण येतात. ही ‘डे-केअर’ सेवा आहे. यामुळे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रुग्णसेवा दिली जात आहे. येथे येणाºया रुग्णांसाठी आवश्यक औषधी व चाचण्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता टप्प्याटप्प्याने ‘ओपीडी’चा विकास केला जाईल, असेही डॉ. दत्ता यांनी सांगितले. बस व सायकलची व्यवस्थाएम्सचा परिसर हा २०० एकरमध्ये पसरलेला आहे. वसतिगृहापासून ते कॉलेज दूर आहे. यामुळे विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. एमबीबीएसच्या प्रथम बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा व इतर सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या वर्षाच्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळासारख्या आवश्यक सोयी नोव्हेंबर महिनाअखेरपर्यंत उपलब्ध होतील. ‘कॅम्पस’मध्ये विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी सायकली आहेत. या परिसरात विद्यार्थ्यांच्या दुचाकींना बंदी आहे, असेही डॉ. दत्ता म्हणाल्या.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलnagpurनागपूर