शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात सरकारच्या कामाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 15:28 IST

राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात महाविकास आघाडीच्या सरकारने कामाला सुरूवात केली असून, पुढील काळात त्याचे श्रेय घेता यावे, या एकमेव हेतूने भारतीय जनता पक्ष विधानसभेत गोंधळाचे राजकारण करीत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आ. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांप्रती भाजपचा कळवळा साफ खोटा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात महाविकास आघाडीच्या सरकारने कामाला सुरूवात केली असून, पुढील काळात त्याचे श्रेय घेता यावे, या एकमेव हेतूने भारतीय जनता पक्ष विधानसभेत गोंधळाचे राजकारण करीत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आ. अशोक चव्हाण यांनी केली आहे. शेतकऱ्यांप्रती फार कळवळा असल्याचे भाजप भासवत असला तरी तो साफ खोटा असल्याचा आरोपही त्यांनी केला.हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना आ. चव्हाण यांनी शेतकऱ्यांबाबत भाजपची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, मागील पाच वर्षे भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली. भाजपने शेतकऱ्यांसाठी केवळ घोषणा केल्या. त्याची योग्य अंमलबजावणी केली नाही. अजूनही राज्यातील लाखो शेतकरी बोंडअळीची मदत, पीक विम्याची भरपाई आणि कर्जमाफी योजनेपासून वंचित आहे. आज ते शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा आव आणत आहेत. मात्र, त्यांच्या सरकारच्या काळात झालेली फसवणूक पाहता त्यांना शेतकऱ्यांच्या मुद्यावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.महाविकास आघाडीच्या सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची त्यांनी पाहणीही केली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात कामाला सुरूवात झालेली आहे. राज्याच्या अर्थमंत्र्यांनी सुद्धा त्यात लक्ष घातले आहे. शेतकऱ्यांना मदत देण्याच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या हालचाली सुरू असल्याने हे आमच्याच प्रयत्नांमुळे घडत असल्याचे चित्र रंगवण्यासाठी आणि पुढील काळात त्याचे श्रेय घेण्यासाठी भाजपने आटापिटा सुरू केल्याचे आ. अशोक चव्हाण यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनAshok Chavanअशोक चव्हाण