शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

बीअर शॉपी की ओपन बार? उपराजधानीतील वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 10:27 IST

बीअर शॉपीत फक्त बंद बाटल्यातच बीअर विकण्यास परवानगी आहे. पण उपराजधानीतील अनेक चालकांनी तळीरामांसाठी शॉपीमध्येच बीअर पिण्यासाठी प्लास्टिक ग्लास आणि चकण्याची खास व्यवस्था केली आहे.

ठळक मुद्देवरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाहीपरवाना रद्द करण्याचा अधिकार

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बीअर शॉपीत फक्त बंद बाटल्यातच बीअर विकण्यास परवानगी आहे. पण अनेक चालकांनी तळीरामांसाठी शॉपीमध्येच बीअर पिण्यासाठी प्लास्टिक ग्लास आणि चकण्याची खास व्यवस्था केली आहे. आर्थिक व्यवहारामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले असून शॉपीलगतच्या रहिवाशांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे.विकत घेतलेली बीअर कुठे प्यावी, हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. घरी घेऊन जाणे शक्य नाही. हॉटेलमध्ये जावे तर मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. या समस्येवर शॉपीचालकांनी तळीरामांची पिण्याची सोय करून त्यावर तोडगा काढला आहे. बीअर शॉपी की ओपन बार, असा प्रश्न यानिमित्ताने उभा राहिला आहे. बीअर संपली की जागा सोडाशॉपीमध्ये वा पायऱ्यांवर बीअर रिचविणाऱ्यांना वेळेचे बंधन असते. बीअर संपली की जागा सोडा, असा आदेश शॉपीच्या नोकराकडून दिला जातो. तळीराम लगेच आदेश पाळतो आणि दुसऱ्यासाठी जागा रिक्त करतो, असे पाहणीदरम्यान आढळून आले. बीअर बारमध्ये एमआरपीपेक्षा दुप्पट दर आकारले जातात. हा आर्थिक भुर्दंड सहन करणे दररोजच ढोसणाऱ्यांना कठिण असल्यामुळे उन्हाळ्यात बीअर शॉपीमध्ये गर्दी वाढली आहे.

शॉपीच्या बोर्डवर कंपन्यांची जाहिरातनागपूर शहरात ५० च्या आसपास तर जिल्ह्यात एकूण ८२ बीअर शॉपी सुरू आहेत. शहरातील अनेक शॉपीच्या बोर्डवर मद्य कंपन्यांची जाहिरात आहे. कंपन्याची जाहिरात करणे गुन्हा आहे. पण कायदा धाब्यावर बसवून कंपन्यांची जाहिरात करणे सुरूच आहे. काही शॉपींनी जाहिरात पांढऱ्या कपड्यांनी झाकली आहे तर काहींच्या बोर्डवर जाहिरात अजूनही झळकत आहे.

उघड्यावर दारू व बीअर पिणे गुन्हाउघड्यावर दारू, बीअर पिणे कायद्याने गुन्हा आहे. पण सर्वत्र कायद्याचे उल्लंघन करण्यात येत आहे. मालकांना रिकाम्या बाटल्या, चकण्याच्या विक्रीतून अतिरिक्त उत्पन्न मिळत असल्यामुळे उन्हाळ्यात अनेक वस्तीतील बीअर शॉपी तळीरामांनी गजबजलेल्या दिसून येत आहे. पोलिसांनीही या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष केले आहे. आर्थिक व्यवहारामुळे शॉपी चालकांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांची भीती नसल्यामुळे बिनधास्त व सहज बीअर पिता येत असल्याने या शॉपींकडे मोठ्या संख्येत तरुण वर्ग वळत आहे. पोलीस प्रशासन आणि दारुबंदी विभागाने खुलेआम बीअर पिण्याचा परवाना दिला आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शॉपीत व बाहेर पायऱ्यांवर अड्डाउन्हाळ्यात बहुतांश शॉपीमध्ये आणि पायऱ्यांवर बीअर पिण्याचे प्रकार सुरू आहेत. अनेक शॉपीने शेड तयार केले आहेत. बहुसंख्य शॉपी वस्तीत वा अपार्टमेंटमध्ये आहेत. नंदनवनच्या एनआयटी क्वॉर्टरमधील दुकानांमध्ये दोन बीअर शॉपी सुरू आहेत. या ठिकाणी सायंकाळी ५ वाजेपासून तळीरामांची गर्दी होण्यास सुरुवात होते. ही गर्दी उत्तरोत्तर वाढतच जाते. असाच प्रकार महाल, सक्करदरा, संगम टॉकीज चौकातील शॉपीमध्ये नेहमीच दिसून येतो. कुणाला काही बोलल्यास तळीराम वाद घालतात. त्यामुळे न बोलणेच बरे, अशी प्रतिक्रिया एक नागरिकाने लोकमतशी बोलताना दिली.

कारवाई सुरू आहेबारचे स्वरुप झालेल्या बीअर शॉपीवर कारवाई करण्यात येत आहे. गेल्यावर्षीही कारवाई करण्यात आली होती.स्वाती काकडे, नागपूर जिल्हा अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क विभाग.

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदा