राणा आणि त्यांचा मित्र यादव हे दोघे ग्राउंडजवळ गप्पा करत असताना, आरोपी सचिन शेलारे, रणजीत महतो आणि त्यांचा एक साथीदार तेथे येऊन बीयर पिऊ लागले. त्यांना राणा यांनी विरोध केला असता, आरोपींनी राणा यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर अंबाझरी पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
---
नंदनवनमध्ये घरफोडी
नागपूर : विद्यानगर वाठोडा ले-आउटमध्ये राहणारे प्रशांत मधुकर कामडे यांच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख आणि दागिने असा एकूण ९० हजारांचा ऐवज चोरून नेला. नंदनवन पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
---
विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह
नागपूर : हुडकेश्वरच्या सुदर्शननगरात राहणाऱ्या कमलाबाई रघुनाथ हाडके (वय ८४) यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी रविवारी सायंकाळी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
---