शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बुद्ध व्हा... शुद्ध व्हा....!!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 22:37 IST

हातात काठी. डोक्यावर निळी टोपी, फाटलेले जोडे, मळकट सदरा नि त्याहून मळकट धोतर ! दीक्षाभूमीवर थांबलेल्या लोकांची आस्थेने विचारपूस करु न बाबासाहेबांचे विचार सांगणारा ७० वर्षीय वृद्ध. वयाने थकलेला, मात्र मनाने अजूनही तरुण असलेल्या वृद्धाचा हा प्रवास आठ वर्षांपासूनचा आहे. केरूआ तुकाराम शिंदे त्या व्यक्तीचे नाव.

ठळक मुद्देदीक्षाभूमीवर भेटलेली निळाई 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हातात काठी. डोक्यावर निळी टोपी, फाटलेले जोडे, मळकट सदरा नि त्याहून मळकट धोतर ! दीक्षाभूमीवर थांबलेल्या लोकांची आस्थेने विचारपूस करु न बाबासाहेबांचे विचार सांगणारा ७० वर्षीय वृद्ध. वयाने थकलेला, मात्र मनाने अजूनही तरुण असलेल्या वृद्धाचा हा प्रवास आठ वर्षांपासूनचा आहे. केरूआ तुकाराम शिंदे त्या व्यक्तीचे नाव.जालना जिल्ह्यातील एका छोटाशा गावातून ते मंगळवारी दीक्षाभूमीला पोहचले. त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा बायकोसोबत दीक्षाभूमीला आलो होतो. नंतर संसाराला लागलो. आठ वर्षांपूर्वी पत्नी वारली. तेव्हापासून दरवर्षी येतो. वय झाल्यामुळे घरची मंडळी जाऊ देत नाही, गुपचूप येतो. येथे येऊन आपल्या लोकांची गाठभेट घेतोे. त्यांना बाबासाहेबांच्या कार्याची माहिती सांगतो. अशिक्षित असलो तरी ज्या काही चार गोष्टी माहीत आहे त्या सांगतो. शाळा शिकणं म्हणजे बाबासाहेबांची भक्ती करण्यासारखं आहे. लेकरांना शिकवा. त्यांना मोठ करा. त्यांना बाबासाहेब सांगा. बाबासाहेबानं त्याग केला म्हणून आपण सुखी आहोत, असे म्हणत असताना ते भावुक झाले. धोतराने डोळे पुसत त्यांनी ‘बुद्ध व्हा...शुद्ध व्हा’ हे गीत आपल्या कापऱ्या आवाजात गायिले. केरूआ मोठा माणूस नसला तरी बाबासाहेबांच्या विचारांनी त्याचे मन मोठे झाल्याची प्रचिती आल्यावाचून राहात नाही. 

दिल्ली येथून आले वालदे कुटुंब जी व्यक्ती बुद्धाच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे वागते, आचरण करते ती स्वत:चा विकास साधू शकते. बुद्धाचे तत्त्वज्ञान जर प्रत्येक नागरिकाने आचरण्याचा प्रयत्न केला तर या जगातील किती तरी दु:खे कमी होतील व विश्वात शांतता नांदेल, असा विश्वास दिनेश वालदे यांनी बोलून दाखविला. धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी वालदे हे सहकुटुंब दिल्ली येथून मंगळवारी दीक्षाभूमीवर पोहचले.‘लोकमत’शी बोलताना त्यांच्या पत्नी डॉ. नीशा वालदे म्हणाल्या, बुद्धाचा धम्म हा विज्ञानवादी आहे व नीतिमत्ता त्याचा पाया आहे. त्यातूनच समाजाला वेगळी दिशा मिळू शकते. जो समाज नीतिमान आहे, तो समाज प्रज्ञावंत आहे. तो यशवंत आहे, तो समाज बलवंत आहे, तो समाज धनवंत आहे आणि या सर्व गोष्टी आचरणातूनच निर्माण होणाऱ्या आहेत. बाबासाहेबाच्या या पवित्र भूमीवर आल्यावर एक नवीन ऊर्जा मिळते. ही धम्म चळवळीला समोर नेण्यास मदत करते, असेही त्या म्हणाल्या.