शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘सेक्स अपील’ नसल्यानेच शेतकरी उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:38 IST

सध्याचे जग ग्लॅमरचे आहे. जे खपते तेच विकले जाते. शेती आणि शेतकरी या विषयात ‘सेक्स अपील’ नाही. म्हणूनच या देशात शेतकरी हा कायम उपेक्षेचा विषय ठरत आला आहे, ...

ठळक मुद्देचंद्रकांत वानखडे : ‘माझा शेतकरी’ विषयाला समर्पित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सध्याचे जग ग्लॅमरचे आहे. जे खपते तेच विकले जाते. शेती आणि शेतकरी या विषयात ‘सेक्स अपील’ नाही. म्हणूनच या देशात शेतकरी हा कायम उपेक्षेचा विषय ठरत आला आहे, अशा कठोर शब्दात ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे यांनी सरकारी व्यवस्थेवर प्रहार केला.नानू नेवारे यांनी काढलेल्या ‘माझा शेतकरी’ या विषयाला समर्पित तीन दिवसीय छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी संध्याकाळी चिटणवीस सेंटर येथे त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. विदर्भ कला अकादमीतर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी कवी व विचारवंत डॉ. यशवंत मनोहर तर प्रमुख अतिथी म्हणून चित्रकार प्रमोदबाबू रामटेके, हरिहर पेंदे,डॉ. विनोद इंदूरकर उपस्थित होते. वानखडे पुढे म्हणाले, आतापर्यंत ३ लाख ७० हजार शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. हा अधिकृत आकडा आहे. नोंद न झालेल्या मृत शेतकºयांचा आकडा तर याहून खूप मोठा आहे. हे विदारक चित्र शासनाला दिसत नाही. ते गाय पोसणाºया शेतकºयांना सोडून गायीच्या स्वरक्षणात लागले आहेत. नेवारे यांनी आपल्या छायाचित्रातून अशा ‘नॉन ग्लॅमरस’ शेतकºयांच्या व्यथा मांडल्या याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. प्रमोदबाबू रामटेके म्हणाले, ही फक्त छायाचित्रे नाहीत तर कलाकृती आहेत. कारण त्या कॅमेºयातून काढल्या असल्या तरी त्या चित्रात अर्थ शोधणारी दृष्टी कलावंताची आहे. डॉ. यशवंत मनोहर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व वक्त्यांच्या भाषणाचा परमार्श घेतला आणि ही छायाचित्रे वास्तवामागील वास्तव मांडणारी असून त्यातील शेतकºयांच्या वेदना पाहता क्षणीच अस्वस्थ करीत असल्याचे सांगितले. यावेळी हरिहर पेंदे व डॉ. विनोद इंदूरकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन रमेश लखमापुरे यांनी केले.