शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांमुळे भाजपाला ‘राम’ आठवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 04:30 IST

राममंदिराचा मुद्दा न्यायालयात असल्याने त्यावर बोलणे योग्य होणार नाही.

नागपूर : राममंदिराचा मुद्दा न्यायालयात असल्याने त्यावर बोलणे योग्य होणार नाही. न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य करावा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा कारभार चालवित आहेत. गेल्या साडेचार वर्षांच्या सत्ताकाळात त्यांना राममंदिराचा मुद्दा महत्त्वाचा वाटला नाही. आता तीन महिन्यावर निवडणुका आल्याने मताचे ध्रुवीकरण करण्यासाठी भाजपा व संघाला ‘राम’ आठवल्याची घणाघाती टीका लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी केली.ख्र्रिश्चन को-आॅर्डिनेशन कमिटी नागपूरतर्फे मेकोसाबाग येथील मैदानावर आयोजित मसीही अधिकार संमेलनात खर्गे बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, काँग्रेसचे सचिव आशिष दुवा, अखिल भारतीय अल्पसंख्य आघाडीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अली थॉमस, आदी उपस्थित होते.खर्गे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे मोठे योगदान आहे. महात्मा गांधी यांना हा देश सर्वधर्मियांचा असल्याचे म्हटले होते. डॉ. आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व घटकांना न्याय दिला. देशाचा कारभार संविधानाच्या माध्यमातून चालावा. संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपण सर्वांचीच आहे. संरक्षण करताना कुणाला काहीच मिळाले नाही तरी बलिदानाची तयारी ठेवा.>मूठभरांचेच भले केलेख्रिश्चन मिशनरीने शिक्षण व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देशासाठी योगदान दिले आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी शिक्षणाचा अधिकार दिला. परंतु आज केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात आरोग्य व शिक्षणासाठी तरतूद नाही. भाजपाचा सबका साथ सबका विकासाचा नारा असला तरी मूठभर कार्पोरेट कंपन्याच्या भल्यासाठी केंद्र सरकार धोरणे राबवित असल्याचा आरोप खर्गे यांनी केला.