शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

नागपुरात ब्युटी पार्लरच्या आड कुंटणखाना : महिलेसह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 23:14 IST

अजनीतील गायकवाडनगरात ब्युटी पार्लरच्या आडून वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला आणि तिच्या साथीदाराला पोलिसांनी शनिवारी सायंकाळी पकडले.काजल जुगल कैथेले (वय २२, रा. चंदननगर) आणि अमोल गुणवंत मदामे (वय ४५, रा. स्वावलंबीनगर) अशी कुंटणखाना चालविणाऱ्या आरोपींची नावे आहेत.

ठळक मुद्देअजनी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अजनीतील गायकवाडनगरात ब्युटी पार्लरच्या आडून वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला आणि तिच्या साथीदाराला पोलिसांनी शनिवारी सायंकाळी पकडले.काजल जुगल कैथेले (वय २२, रा. चंदननगर) आणि अमोल गुणवंत मदामे (वय ४५, रा. स्वावलंबीनगर) अशी कुंटणखाना चालविणाऱ्या आरोपींची नावे आहेत.काजलने गायकवाडनगरात काही महिन्यांपूर्वी ग्लोरी ब्युटी पार्लर सुरू केले. येथे प्रारंभी महिला-मुलींना सौंदर्याचे धडे देणाऱ्या काजलने नंतर त्यांना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात ढकलणे सुरू केले. यासाठी तिचा साथीदार अमोल तिला मदत करीत होता. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला-मुलींची काजलच्या ब्युटी पार्लरमध्ये गर्दी वाढल्यानंतर ती येथेच ग्राहकांना बोलावून त्यांना वारांगना उपलब्ध करून देऊ लागली. त्यांच्याकडून ती बक्कळ रक्कम घेत होती. ही माहिती अजनीचे ठाणेदार एच. एल. उरलागोंडावार यांनी पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांना कळविली. त्यानंतर पोलिसांनी तेथे कारवाईसाठी सापळा रचला. त्यानुसार, शनिवारी सायंकाळी काजल, अमोलकडे एक ग्राहक पाठविण्यात आला. त्याने वारांगनेची मागणी करताच काजल आणि अमोलने त्याच्याकडून रक्कम स्वीकारून त्याला देहविक्रय करणारी एक वारांगना उपलब्ध करून दिली. त्यानंतर काही वेळेतच पोलिसांनी तेथे छापा घातला. पोलिसांनी आरोपी काजल तसेच अमोलला अटक केली. वृत्त लिहिस्तोवर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :raidधाडSex Racketसेक्स रॅकेट