शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत असे वाढेल नागपूरचे सौंदर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 11:59 IST

येत्या पाच वर्षांत नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर व हिरवेगार करून देशात क्रमांक एकचे सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात येत आहे.

ठळक मुद्देगडकरींच्या निर्देशानुसार मास्टर प्लॅनची तयारी रस्ते, तलाव, नदी-नाले हिरवेगार करण्याचे लक्ष्य

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येत्या पाच वर्षांत नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर व हिरवेगार करून देशात क्रमांक एकचे सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निर्देशानुसार, या प्रकल्पासाठी ‘नागपूर शहर सौंदर्यीकरण समिती’ स्थापन करण्यात आली असून, त्यांनी यासाठी १० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती आहे. समितीच्या नियंत्रणाखाली शहरातील रस्ते, तलाव, नदी, नाले, मैदाने, उद्याने व मोकळ्या जागांना लोकसहभागातून वृक्षारोपणाने हिरवेगार करण्यात येणार असून, जागतिक स्तराच्या शहरानुसार सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.प्रकल्पासाठी समितीचे समन्वयक म्हणून वनस्पती तज्ज्ञ व सौंदर्यीकरणाच्या विविध प्रकल्पाचा अनुभव असलेले दिलीप चिंचमलातपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिंचमलातपुरे यांनी लोकमतशी बोलताना या प्रकल्पाविषयी माहिती दिली. हा नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पांतर्गत जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, बांधकाम विभागाचे अधिकारी, महापौर व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांशी विविध स्तराच्या बैठका घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शहर सौंदर्यीकरणाचे हे कार्य पूर्णपणे लोकसहभागातून राबविण्यात येणार असून, त्यासाठी शाळा-महाविद्यालयांचे प्रशासन व विद्यार्थी, तसेच विविध नागरिक संस्था व सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.प्रकल्पाचा पहिला टप्पा रस्त्यांवर केंद्रित करण्यात आला आहे. शहरात २७०० किमीचे रस्ते आहेत. या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला व दुभाजकांवर वाहतुकीला व विद्युतीकरणाला अडचण होणार नाही, अशा पद्धतीने विशिष्ट प्रजातीची झाडे लावण्यात येणार आहेत. यापुढे शहरातील लहान-मोठी उद्याने नव्याने वृक्षाच्छादित करण्यात येणार आहेत. याअंतर्गत औषधी वनस्पती, वेदिक वनस्पती, अधिक काळ टिकणाºया वनस्पती, फुलझाडे व फळझाडांचा समावेश राहणार आहे. मैदानांच्या सभोवताल व उपयोगात नसलेल्या मैदानात पूर्णपणे वृक्षारोपण करण्यात येणार आहे; शिवाय शक्य होईल तिथे हर्बल गार्डन विकसित करण्याचाही समितीचा प्लॅन आहे. या उद्यानात बसण्या-उठण्या व फिरण्याची विशेष सोय करण्यात येणार आहे. यानंतर शहरातील १२ तलावांचे खोलीकरण करून ही माती रस्ते दुभाजकांमध्ये वापरण्यात येणार आहे. तसेच तलावांच्या सभोवारही सुंदर अशा झाडांची लागवड करून सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. नदी आणि नाल्याच्या काठावरही औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती व अधिक काळ टिकाणाºया निलगिरी, अर्जुन यासारख्या वृक्षांची लागवड केली जाणार आहे. तलावांना सुंदर असे रूप मिळेल, यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे चिंचमलातपुरे यांनी सांगितले. काही तलावांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाणही अधिक आहे. अशा तलावांच्या सभोवताल १२ ते १४ फुटाचे फेन्सिंग लावण्यात येईल व केवळ विशिष्ट गेटमधूनच विशिष्ट वेळेत प्रवेश देण्यात येण्याची योजना आखण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशाप्रकारे टप्प्याने संपूर्ण शहराला नवे रूप देण्यात येणार आहे.सध्या या संपूर्ण प्रकल्पाचा मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम सुरू आहे. मिळालेल्या निधीतून आवश्यक साहित्य खरेदी करण्यासह सामाजिक संस्था, नागरिक व शाळा-महाविद्यालयांना या प्रकल्पात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी