शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील सक्करदरा तलावाचे सौंदर्यीकरण लवकरच : महापारांनी दिले निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 21:31 IST

सक्करदरा तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. या प्रकल्पाला अधिक विलंब न करता तलाव सौंदर्यीकरणाला तातडीने सुरूवात करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी सोमवारी दिले.

ठळक मुद्देमनपा अधिकाऱ्यासोबत केला पाहणी दौरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: सक्करदरा तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. या प्रकल्पाला अधिक विलंब न करता तलाव सौंदर्यीकरणाला तातडीने सुरूवात करण्याचे निर्देश महापौरसंदीप जोशी सोमवारी दिले. प्रभागाचे नगरसेवक व संबंधित अधिकारी यांच्यासमवेत महापौरांनीसक्करदरा तलावाचा पाहणी केली. प्रकल्पाची परिस्थिती जाणून घेतल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी आवश्यक निर्देश दिले.यावेळी उपमहापौर मनीषा कोठे, नेहरूनगर नगर झोन सभापती समिता चकोले, आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे, नगरसेविका दिव्या धुरडे, रिता मुळे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता अमीन अख्तर, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) मनोज गणवीर, कार्यकारी अभियंता (विद्युत) अजय मानकर, उप अभियंता रुपराव राऊत यांच्यासह कंत्राटदार उपस्थित होते.तलाव सौंदर्यीकरण संदर्भात अमीन अख्तर आणि निशिकांत भिवगडे यांनी माहिती दिली. प्रस्तावित विकास कामांचे नकाशे सादर केले. प्रस्तावानुसार तलावाला संरक्षक भिंत, तलावाच्या एका बाजुला उद्यान, एका बाजुने राजे रघूजी भोसले यांच्या जीवनावर आधारित म्युरल व त्यांचा जीवनपट असणार असल्याची माहिती त्यांनी दिली.एका बाजूस फूड कोर्ट, प्रशस्त उद्यान असणार आहे. तलावाच्या सभोवताल चालणाऱ्यांसाठी जॉगिंग ट्रॅक राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या सर्व कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कार्यादेश देण्याच्या मार्गावर काम आहे. कार्यादेश होताच कामाला सुुरुवात केली जाणार आहे.सक्करदरा तलाव संवर्धन निधीसाठी महापालिकेतर्फे शासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला. यासाठी शासनाकडुन निधी आलेला आहे. आधीच उशीर झाला आहे, आता कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश जोशी यांनी दिले. तलावातील स्वच्छतेसंदर्भात काय उपाययोजना करता येईल याचाही विचार करण्यात यावा, असेही महापौरांनी सांगितले. तलावात कचरा टाकला जावू नये यासाठी तलावाच्या सभोवताल ७ ते८ फुटाची सरंक्षक जाळी लावण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीMayorमहापौरSakkardara Lakeसक्करदरा तलाव