शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

दिव्यांग ई-रिक्षा चालकाला मारहाण, बर्डी ठाण्याला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 00:05 IST

दिव्यांग ई-रिक्षा चालकाला मारहाण केल्यामुळे विदर्भ विकलांग संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी दुपारी सीताबर्डी पोलीस ठाण्याला घेराव घालून आंदोलन करण्यात आले. दोषी आॅटोचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी दिव्यांगांनी केली. दरम्यान दुपारी सीताबर्डी पोलिसांनी दोषी आॅटोचालकाला अटक केल्यामुळे दिव्यांगांनी आपले आंदोलन मागे घेतले.

ठळक मुद्देअटक केल्यानंतर घेतले आंदोलन मागे

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिव्यांग ई-रिक्षा चालकाला मारहाण केल्यामुळे विदर्भ विकलांग संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी दुपारी सीताबर्डी पोलीस ठाण्याला घेराव घालून आंदोलन करण्यात आले. दोषी आॅटोचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी दिव्यांगांनी केली. दरम्यान दुपारी सीताबर्डी पोलिसांनी दोषी आॅटोचालकाला अटक केल्यामुळे दिव्यांगांनी आपले आंदोलन मागे घेतले.विदर्भ विकलांग संघर्ष समितीचे सदस्य शेषराव मांडवकर हे ई-रिक्षा चालवितात. २६ सप्टेंबरला दुपारी १ वाजता सीताबर्डी परिसरात ई-रिक्षा चालवीत असताना एमएच ३१, ईपी-०९८९ या क्रमांकाच्या आॅटोचालकाने त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत मांडवकर यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु दोन दिवस होऊनही दोषी आॅटोचालकावर सीताबर्डी पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. मारहाण करणारा दोषी आॅटोचालक खुलेआम फिरत असल्यामुळे विदर्भ विकलांग समितीचे दिव्यांग सदस्य संतापले. त्यांनी दोषी आॅटोचालकावर त्वरित कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवारी दुपारी सीताबर्डी पोलीस ठाण्याला घेराव घातला. दिव्यांगबांधव ठाण्यात एकत्र जमले. दोषी आॅटोचालकावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी रेटून धरली. त्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी दुपारी ३ वाजताच्या सुमारास दोषी आॅटोचालकाला अटक केली. त्यानंतर दिव्यांग बांधवांनी आपले आंदोलन मागे घेतले.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेagitationआंदोलन