.............
अल्पवयीन मुलाचे अपहरण
नागपूर : अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी पळवून नेणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विजुबेन वेरसी गोडकिया (७०) यांचा १७ वर्षांचा नातू घरून निघून गेला. त्याचा शोध घेतला असता तो कोठेच आढळला नाही. याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
..........
दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण
नागपूर : दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याप्रकरणी कळमना पोलिसांनी पळवून नेणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १६ वर्षांच्या मुलीला अज्ञात आरोपीने फूस लावून पळवून नेले. दरम्यान, तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर, दुसऱ्या घटनेत कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुसरी १६ वर्षांची मुलगी घरून निघून गेल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
...
गळफास घेऊन इसमाची आत्महत्या
नागपूर : आपल्या राहत्या घरी मंडप बांधण्याच्या चिंधीने गफळास घेऊन एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. अमोल रमेश जांभुळकर (४०), रा. बाबा बुद्धनगर यांनी आपल्या घरी मंडप बांधण्याच्या चिंधीने गफळास घेतला. त्यांना मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
...........