शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
3
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
4
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
5
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
6
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
7
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
8
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
9
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
10
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
11
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
12
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
13
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
14
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
15
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
16
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
17
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
18
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
19
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
20
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!

प्रेरणाभूमीत उसळणार भीमसागर!

By admin | Updated: April 14, 2016 03:17 IST

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती संपूर्ण देशभरात साजरी करण्यात येत आहे.

शतकोत्तर रौप्य महोत्सव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमनागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती संपूर्ण देशभरात साजरी करण्यात येत आहे. भीम जयंती साजरी करण्यासाठी प्रेरणाभूमी असलेल्या नागपुरातही शेकडो संघटना कामाला लागल्या आहेत. यामध्ये आंबेडकरी अनुयायांसह विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघटना तसेच शैक्षणिक संस्था व शासकीय कार्यालयातही भीम जयंतीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संविधानाने समतावादी लोकशाही राष्ट्र बहाल करून अखंड भारताचा राजकीय, सामाजिक व आर्थिक पाया भक्कमपणे बसविणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सर्व समाज एकवटला आहे.भारतीय जनता पक्षडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे गुरुवारी सकाळी ९.३० वाजता शहीद गोवारी स्मारक ते संविधान चौकापर्यंत अभिवादन मार्च काढण्यात येणार आहे. या मार्चमध्ये भाजपचे शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, खासदार अजय संचेती, माजी खा. बनवारीलाल पुरोहित, आ. कृष्णा खोपडे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. विकास कुंभारे, आ. अनिल सोले, आ.ना.गो. गाणार, आ. गिरीश व्यास, महापौर प्रवीण दटके, स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत आदी मान्यवर सहभागी होतील.परमाणू खनिज अन्वेषण व अनुसंधान निदेशालयपरमाणू खनिज अन्वेषण व अनुसंधान निदेशालय, मध्यक्षेत्र, नागपूर कार्यालयातर्फे १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यालयात सकाळी ११ वाजता अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.डॉ. आंबेडकर शतकोत्तर रौप्य नागरी जयंती समितीडॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य संयुक्त जयंती समितीच्यावतीने डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राष्ट्रीय व सामाजिक एकतेकरिता १४ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता दीक्षाभूमी ते संविधान चौक व परत दीक्षाभूमीपर्यंत बाईक रॅली काढण्यात येणार आहे. डॉ. बी.आर. आंबेडकर वेट्स असोसिएशनपशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. बी.आर. आंबेडकर वेट्स असोसिएशनतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जयंती समारोहाची रक्तदान शिबिराने सांगता होणार आहे.भारतीय विमानतळ प्राधिकरण भारतीय विमानतळ प्राधिकरण, मिहान इंडिया लिमिटेड तसेच अनुसूचित जाती-जनजाती कर्मचारी कल्याण संघटनेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे गुरुवारी सकाळी १० वाजता डॉ. आंबेडकर जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. विमानतळ संचालक अवधेश प्रसाद यांच्या उपस्थितीत भन्ते सुरई ससाई यांच्या हस्ते १२५ भन्तेजींना चिवरदान करण्यात येईल.भारतीय जीवन विमा निगमभारतीय जीवन विमा निगम, नागपूर मंडळ कार्यालयातर्फे गुरुवारी सकाळी ९.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य विज्ञान शिक्षण संस्थाराज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात येत आहे. सकाळी १० वाजता अभिवादनानंतर विजय मेश्राम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.पंचशील तरुण उत्सव मंडळडॉ. बाबासाहेब आंबेडकर पंचशील तरुण उत्सव मंडळातर्फे जयभीमनगर, त्रिशरण चौक येथे सकाळी ८ वाजता सामूहिक बुद्धवंदना व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. १५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वा. आॅर्केस्ट्रा, १६ एप्रिल रोजी चित्रकला स्पर्धा व भीम-बुद्ध गीतांची स्पर्धा, १७ एप्रिल रोजी रामपाल महाराजांचे खंजेरी वादन व प्रबोधन.परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीपरमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीच्यावतीने डॉ. आंबेडकरांची १२५ वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. जयंती महोत्सवाअंतर्गत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय समाज व्यवस्थेविषयी चिंतन’ या विषयावर निवृत्त न्यायाधीश बी.जे. कोळसे पाटील यांचे व्याख्यान गुरुवारी सायंकाळी ५ वाजता दीक्षाभूमी येथे आयोजित करण्यात आले आहे. भीमक्रांती महासंघधम्मगर्जना चौक, स्वातंत्र्यनगर, नंदनवन येथे गुरुवारी सकाळी ९ वाजता धम्मध्वजारोहण व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ एप्रिल रोजी मेयो रुग्णालयातर्फे रक्तदान शिबिराने जयंती महोत्सवाची सांगता होणार आहे.कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनाजिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर नव्याने स्थापित झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्यावतीने गुरुवारी डॉ. आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम होणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रसार समितीकाचीमेट येथील बौद्धविहारात गुरुवारी सकाळी ८ वाजता धम्मध्वजारोहण व त्रिरत्नवंदना घेण्यात येईल. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार प्रा. जगन वंजारी व माहिती संचालक मोहन राठोड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता विहारातून धम्मरथ मिरवणूक काढण्यात येईल व रात्री ८ वाजता बुद्ध-भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित होईल.डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्यावतीने उंटखाना चौक येथे सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध गझल गायक अनिल भगत यांच्या आंबेडकरी जलसाचे आयोजन करण्यात येणार आहे.बहुजन आधार संघबहुजन आधार संघ महाराष्ट्र प्रदेशतर्फे अध्यक्ष धीरज गजभिये, चंदा भेंडे व दिलीप तिरपुडे यांच्या नेतृत्वात गुरुवारी दुपारी १ वाजता यशवंत स्टेडियम, धंतोली ते संविधान चौकापर्यंत महामानव अभिवादन महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दलित, ओबीसी, आदिवासी, मुस्लीम, भटके विमुक्त जाती व धार्मिक अल्पसंख्यक एकतेचा संदेश या रॅलीतून देण्यात येणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीपरमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्यावतीने टेलिफोननगर चौक येथून विविध मार्गाने डॉ. आंबेडकर अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता आमदार सुधाकर कोहळे या रॅलीचे उद््घाटन करतील.मानेवाडा रोड मजूर ठिय्या फत्तुजी बावणे यांच्यातर्फे मानेवाडा रोड लेबर मजूर ठिय्या पोस्ट आॅफिसजवळ सकाळी ९ वाजता थंड पाण्याच्या प्याऊचे उद््घाटन होणार आहे.कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघकास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्यावतीने यशवंत स्टेडियम, धंतोली येथील कार्यालयात दुपारी २ वाजता सार्वभौम कार्यकर्ता सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुरातत्त्व विभागाचे माजी अधीक्षक एन.जी. निकोशे यांचे व्याख्यान यावेळी होईल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या प्रांगणात डॉ. आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती साजरी करण्यात येणार आहे. कुलगुरू सिद्धार्थविनायक काणे यांच्या उपस्थितीत सकाळी १०.३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन होईल. धनवटे नॅशनल कॉलेज धनवटे नॅशनल कॉलेज येथे गुरुवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय छात्र सेना राष्ट्रीय छात्र सेना गट मुख्यालय, तेलंगखेडी येथे सकाळी ८.३० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. समता सैनिक दलसिद्धार्थनगर, मानेवाडा रिंगरोड येथे सायंकाळी ५.३० वाजता समता सैनिक दल, दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे सेंट्रल कमांड कार्यालयाचे उद््घाटन करण्यात येईल.संयुक्त समारोह समितीसूरज सोसायटी, डीपी रोड, मनीषनगर येथे सकाळी ६ वाजता ‘नवचैतन्याची निळी पहाट’ बुद्ध-भीमगीतांचा कार्यक्रम, सकाळी ९ वाजता डॉ. सुभाष नगराळे, ई.झेड. खोब्रागडे, अशोक जांभूळकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.तिरपुडे कॉलेज ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : काही निरीक्षणे’ या विषयावर एम.डी. महाविद्यालय साकोलीचे डॉ. अनिल नितनवरे यांचे व्याख्यान तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय, सदर येथे आयोजित करण्यात आले आहे. दुपारी १२.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.